वृत्तसंस्था : भारतीय ज्यूनियर पुरुष हॉकी टीमने झालेल्या ज्यूनियर एशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला. आठ वर्षानंतर झालेल्या या टूर्नामेंटला पाहण्यासाठी भारत आणि पाकिस्तानचे समर्थक मोठ्या संख्येत उपस्थित होते. शेवटच्या क्षणी पाकिस्तानने आक्रमक खेळी केली होती. परंतु, भारताचा गोलकिपर मोहित एच एसने चमकदार कामिगिरी केल्यानं पाकिस्तानची रणनिती फोल ठरली. भारतासाठी अंगद बीर सिंगने १२ व्या मिनिटात तर अरायजीत सिंग हुंडलने १९ व्या मिनिटात गोले केले. तर भारताचा माजी मुख्य प्रशिक्षक रोलॅंट ओल्टमेंस यांच्या पाकिस्तानच्या संघाने ३७ व्या मिनिटात फक्त एकमेव गोल केला.
भारतने २००४, २००५ आणि २०१५ नंतर हा किताब चौथ्यांदा जिंकला. तर पाकिस्तान १९८७, १९९२ आणि १९९६ मध्ये चॅम्पियन राहिला आहे. दोन्ही संघ याआधी तीनवेळा ज्यूनियर पुरुष हॉकी एशिया कपच्या फायनलमध्ये भिडले आहेत. पाकिस्तानने १९९६ मध्ये विजय संपादन केला. तर २००४ मध्ये भारत विजयी झाला. भारताने याआधी मलेशियात खेळवण्यात आलेल्या टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानला ६-२ ने पराभूत करून किताब जिंकला होता. यावेळी ही टर्नामेंट आठ वर्षानंतर होत आहे. कोरोना माहामारीमुळे २०२१ मध्ये या टूर्नामेंटचं आयोजन झालं नव्हतं. भारताने आक्रमक सुरुवात करून पाकिस्तानच्या गोलवर पहिल्याच क्वार्टरमध्ये अनेक डाव खेळले. अंगद बीरने भारताला १२ व्या मिनिटात पहिला गोल करून दिला. त्यानंतर अरायजीतने जबरदस्त फिनिशिंग देत १९ व्या मिनिटांत दुसरा फील्ड गोल केला. टूर्नामेंटमध्ये हा त्याचा आठवा गोल होता.
पाकिस्तानचा शाहिद अब्दुलने संधीचा फायदा घेत गोल करण्यात प्रयत्न केला होता. परंतु, भारताचा गोलकीपर मोहित एच एसने त्याचा प्रयत्न हाणून पाडला. दुसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानने आक्रमक अंदाजात खेळी केली. याचा फायदा त्यांना तिसऱ्या क्वार्टरच्या सातव्या मिनिटात झाला. जेव्हा शाहिद अब्दुलने सर्कलच्या जवळून भारतीय डिफेंडर्सला चकवा देऊन गोल केला. पाकिस्तानला ५० व्या मिनिटात पेनेल्टी कॉर्नर मिळाला. परंतु त्यांना गोल करून बरोबरी करता आली नाही. तसंच चार मिनिटानंतर सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. परंतु, त्यात त्यांना यश मिळालं नाही.