कोल्हापूर : ससून रुग्णालयात पोर्शे कार अपघातातील आरोपीच्या रक्ताचे नमुने फेरफार केल्याप्रकरणी आतापर्यंत तिघांना निलंबित करण्यात आले आहे. पुणे ससून रुग्णालयात आरोपीचे ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी विरोधकांकडून तीव्र कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील कारवाई करणार असल्याचे संकेत दिले आहेत. पैशांच्या लालसेपोटी डॉ. अजय तावरेचा कारनामा केला आहे, असं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. पुणे पोर्शे अपघातातील आरोपीचे ब्लड सॅम्पल फेरफार केल्याप्रकरणावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेत या विषयावर भाष्य केलं. राष्ट्रवादीचे नेते, मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘एखादा लोकप्रतिनिधी शिफारस करतो, त्यावेळी मंत्री मान्यता देतात. उंदीर चावल्या प्रकरणी त्यांना निलंबित केलं होतं’.
‘अजय तावरे हे आज पदावर नाहीत, रजेवर होते. अजय तावरे यांनी रजेवर असताना हा प्रकार केला आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नये, यासाठी आम्ही अद्दल घडवू. ३ लाखांसाठी करत असतील तर चुकीचं आहे. डॉ. विनायक काळे यांनी निष्काळजीपणा केल्यानं त्यांनाही सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे, असे ते म्हणाले. ‘डॉ. अजय तावरे यांच्याबाबत मी अनेकवेळा खुलासा केला आहे. आमदार सुनील टिंगरे यांच्यावर शेरा मारला आहे. काही महिन्यांपूर्वी हॉस्पिटलमध्ये उंदीर चावून एकाचा मृत्यू झाला, त्यावेळी समिती नेमली होती. त्याप्रकरणी तावरे यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी पदमुक्त करण्यात आलं होतं. आता हा पदावर नसताना कारनामा केला आहे, असेही मुश्रीफ म्हणाले. ‘तावरेंची अक्षम्य चूक आहे, त्यांना जीवनाची अद्दल घडवणार आहे. त्यांनी पुन्हा अशी चूक कोणाकडून होणार नाही, अशी कारवाई डॉ. तावरे यांच्यांवर होईल. समितीच्या अहवालत विनायक काळे (डीन) यांचा देखील निष्काळाजीपणा आहे. डॉ. काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे, असेही मुश्रीफ पुढे म्हणाले.