मुंबई : विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. आता राज्य सरकारने शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. आता तुम्हाला शिष्यवृत्तीसाठी वारंवार कागदपत्रे द्यावी लागणार नाहीयेत. तुम्हाल नेहमी उत्पन्नाचा दाखला अशी कागदपत्रे अपलोड करावी लागणार नाही. महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड करावीत. तिच माहिती ग्राह्य धरण्यात येणार आहे. ऑटो सिस्टीमद्वारे शिष्यवृत्ती वेळेत विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या आधी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रं द्यावी लागत होती. त्यामुळे या निर्णयामुळे शिष्यवृत्तीची प्रक्रिया सोपी होणार आहे.







