मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाच्या विक्रोळी येथील पिरोजशहा सांस्कृतिक सभागृहातील कार्यालयास भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला असतामहिला, दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी सुविधांसह सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले अपर जिल्हाधिकारी मनोज गोहाड, सहायक पोलीस आयुक्त दिनकर शिलवटे, नायब तहसीलदार महेश पाटील उपस्थित होते. क्षीरसागर, यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीपच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा व विशेष उपाययोजना, मतदार जनजागृती कार्यक्रम, मतदान केंद्रे, कर्मचारी प्रशिक्षण, कायदा-सुव्यवस्था, खर्च सनियंत्रण, आपात्कालीन परिस्थतीत केलेल्या नियोजनाबाबत त्यांनी आढावा घेतला. मुंबई उत्तर पूर्व कार्यालय मतदारांसाठी सुविधांसह सज्ज असल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
मुंबई उपनगर येथे २० मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी पूर्व नियोजनासह मुंबई उत्तर पूर्व कार्यालय सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात एकूण १६,३६,८९० मतदार आहेत. यापैकी पुरुष मतदार ८७७८५५ तर महिला ७५८७९९, तृतीयपंथी २३६ मतदार आहेत. यापैकी नवमतदार पुरुष १०६१९, नवमतदार महिला ७८८८ असे एकूण नवमतदार १८ हजार ५०७ आहेत. दिव्यांग पुरुष मतदार १८२१ तर महिला दिव्यांग मतदार १३३९, दिव्यांग तृतीयपंथी एक असे एकूण ३१६१ दिव्यांग मतदार आहेत. तर, १४५५० ज्येष्ठ मतदार आहेत.