मुंबई : डिसेंबर महिना उलटून गेला आता जानेवारीचाही पहिला आठवडा संपत आला. दरम्यान, अजूनही महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला नाही. मागच्या आठड्यात नोव्हेंबरचे पैसे जमा केले. त्यानंतर आता डिसेंबर- जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. याचसोबत दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे ३००० रुपये महिलांना एकत्र मिळणार आहे. १४ जानेवारीपूर्वी हे पैसे जमा केले जातील. १४ जानेवारीला मकरसंक्रांत आहे तर १५ जानेवारीला महापालिकेची निवडणूक आहे. त्यापुर्वी महिलांना दोन हप्ते दिले जातील, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता नुकताच दिली आहे. आता मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकदाच मिळेल. १० ते १४ जानेवारीपर्यंत पैसे दिले जातील, असं किरण जाधव, महिला व बालविकास अधिकारी सोलापूर यांनी दिली.







