नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला आता बीसीसीआयने चांगलाच दणका दिला आहे. विराट कोहलीने काल एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर बीसीसीआयने आता कोहलीला फटकारले आहे. त्यामुळे आता बीसीसीआय कोहलीवर कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. भारतीय संघ सध्याच्या घडीला आशिया कप २०२३ ची तयारी करत आहे. यासाठी भारतीय संघातील खेळाडू बंगळुरु येथे सराव करण्यात मग्न आहेत. त्यामध्येच भारतीय खेळाडूंची यो-यो चाचणीही घेण्यात आली. या चाचणीत कोहली पास झाला. कोहलीने या चाचणीत १७.२ गुण मिळाले. त्यामुळे स्वारी चांगलीच खुषीत होती. या आनंदाच्या भरात कोहलीने एक गोष्ट केली आणि तीच त्याला चांगलीच महागात पडली आहे. ही चाचणी झाल्यावर कोहलीने आपाल फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. फोटोबरोबर आपण या चाचणीत किती गुण मिळवले हेदेखील टाकले. पण त्याला एक गोष्ट समजली नाही की यामध्ये आपली नेमकी काय चूक झाली आहे.
कोहलीने फोटो शेअर केला तोपर्यंत ठीक होते. पण कोहलीने यो-यो टेस्टमध्ये किती गुण मिळाले हे टाकले आणि तिथे मोठी समस्या झाली. यो-यो टेस्टनंतर खेळाडू आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करू शकतो. पण किती गुण मिळाले हे सांगू शकत नाही. त्यामुळे कोहलीने आता बीसीसीआयचा नियम मोडला आहे. त्यानंतर बीसीसीआयने एक फतवा काढला आहे. त्यानुसार कोणताही भारताचा खेळाडू फिटनेस टेस्टबाबत महत्वाची माहिती सोशल मीडियावरपोस्ट करणार नाही. त्यामुळे आता अन्य खेळाडू यो-यो टेस्टचे गुण सोशल मीडियावर शेअर करू शकत नाहीत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कहलीने बीसीसीआयचा नियम मोडला आहे. त्यामुळे त्याच्यावर आता बीसीसीआय कारवाई करू शकते. त्यामुळे आता बीसीसीआय कोहलीवर कारवाई करते का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. बीसीसीआय या प्रकरणानंतर कोहलीला ताकीद देऊ शकते. पण बीसीसीआय त्याच्यावर अजून कोणती कारवाई करणार का, हे पाहावे लागेल.