• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोल्हापूर

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
August 10, 2026
in कोल्हापूर, कोल्हापूर जिल्हा, महाराष्ट्र
0
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून, आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्यात आली आहे. यापुढे प्रत्येक पात्र शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कागल नगरपरिषदेच्या वतीने हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या जीर्णोद्धार कामाचे लोकार्पण तसेच लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार होत्या. मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून, सध्या राज्यातील ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. यावर्षाअखेर हा आकडा ९० टक्क्यांपर्यंत आणि पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी सुमारे २५ हजार कोटी रुपये खर्च करत असून, वीज वितरण कंपन्यांची ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने भरली आहे. आतापर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ ५६ हजार शेतकऱ्यांना मिळाल्याचे त्यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांनी आरक्षण, मोफत शिक्षण, वंचितांसाठी विविध योजना आणि अस्पृश्यतेविरोधातील ऐतिहासिक निर्णयांमुळे समाजाला नवी दिशा दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान आणि राजर्षी शाहू महाराजांचे विचार या त्रिसूत्रीवर राज्य शासनाची वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. राधानगरी धरण हे शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असून, त्याचा लाभ आजही जनतेला होत असल्याचे त्यांनी सांगितले.

साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी इथेनॉल धोरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इथेनॉलशिवाय साखर कारखानदारी टिकवणे कठीण आहे. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चांना कोणताही अधिकृत आधार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पेट्रोलियम क्षेत्र किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे अशा दाव्यांना पुष्टी देणारा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे त्यांनी नमूद केले. इथेनॉल धोरणामुळे साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती सुधारली असून, ऊस उत्पादकांना वेळेवर आणि योग्य एफआरपी देणे शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीचे नवे उच्चांक गाठले गेले असून, त्याचा सकारात्मक परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झाला आहे. याशिवाय साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेवर भर देण्यात येत असून, स्पेंट वॉश आणि प्रेस मडपासून सीबीजी व सीएनजी निर्मिती केली जाणार आहे. या उपउत्पादनातून मिळणारा अतिरिक्त महसूल कारखान्यांची आर्थिक क्षमता वाढविण्यासोबतच शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि एफआरपी देण्यासाठी वापरला जाईल. देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. राज्यातील शेती, ऊर्जा आणि साखर उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी शासन विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक निर्णय सातत्याने घेतले जातील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Previous Post

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

Next Post

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

admin

admin

Next Post
पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात 'शाम्पू' आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! –  तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! – तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

August 10, 2026
पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2026
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,100)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,810)
  • मुंबई (3,357)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! –  तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! – तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

August 10, 2026
पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! –  तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

राज्यातील चायनीज स्टॉल्स आता FDA च्या रडारवर! – तुकाराम मुंढेंचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन

August 10, 2026
पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुण्यात दुधात ‘शाम्पू’ आणि केमिकल्सची भयानक भेसळ; १० जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 10, 2026
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION