पुणे : पहलगाममध्ये मागील आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ लोकांनी आपला जीव गमावला होता. पहलकांमध्ये मागील आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ लोकांनी आपला जीव गमावला होता. हल्ल्याच्या दरम्यान दहशतवादी भारतीय सैन्याच्या वेशात आले होत. हल्ल्याच्या दरम्यान दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर भारताने अनेक निर्णय पाकिस्तान विरोधात घेतले आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर शासकीय यंत्रणा सतत झाल्या असून रेल्वेने सुरक्षा व्यवस्थेचा फेर आडवा घेण्यास सुरुवात केली आहे. पुण्यात धावणाऱ्या २४ एक्सप्रेस रेल्वे मध्ये विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. पुणे स्थानकाला संवेदनशील स्थानक म्हणून घोषित केले आहे. संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवून अधिक कडक सुरक्षा उपाययोजना राबविल्या आहेत.
पुणे स्थानकात अतिरिक्त निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित स्थानिकांची अनपेक्षित तपासणी केली जात आहे. सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांच्या समन्वयाने स्थानकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे, सोबतच सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे देखील लक्ष ठेवले जात आहे. पुढे सह मिरज कोल्हापूर या महत्त्वाच्या स्थानकांवर श्वान पथकाद्वारे तपासणी केली जात असून सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना शस्त्र बाळगण्याची आदेश देण्यात आले आहे. पुणे विभागातील सुमारे २४ महत्त्वाच्या एक्सप्रेस व मेल गाड्यांमध्ये एक्सपोर्टिंग व्यवस्था करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी एक निरीक्षक नियंत्रण कक्षाशी समन्वय साधून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहे. सुरक्षा बलाची निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रातील गाड्यांमध्ये गस्तीचे काम करत आहे. संवेदनशील बाबीची माहिती त्वरित नियंत्रण कक्षाला दिली जात आहे. स्थानकांवर व गाड्यांमध्ये सध्या देशातील विशेष पथके तैनात करण्यात आली आहे प्रवाशांकडून रेल मदत या प्लॅटफॉर्मवर केल्या जाणाऱ्या तक्रारींची नियमितपणे दखल घेतली जात आहे. असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. मिरज स्थानक संवेदनशील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मिरज रेल्वे स्थानकाची संवेदनशील आहे. या स्थानकात पूर्वीही अनेकदा गुन्हेगारांची धरपकड झाली आहे. स्थानकाबाहेरील परिसरात अनेकदा गुन्हेगारी कारवाई, लुटमरी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर येथील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.







