बीड : बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी जालन्यामध्ये विराट मोर्चा काढण्यात आला, या मोर्चात मोठ्या संख्येने बंजारा बांधव सहभागी झाले होते. हैदराबाद गॅझेट नुसार जीआर काढून एका समाजाला एक न्याय आणि दुसऱ्या समाजाला वेगळा न्याय का ? असा सवाल उपस्थित करत बंजारा समाज आणि आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. आमदार राजेश राठोड आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी एसटी आरक्षणाचा हा लढा महाराष्ट्रभर चालूच राहणार असून गरज पडल्यास मुंबई आणि दिल्लीमध्ये सुद्धा बंजारा समाज मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला.दरम्यान प्रचंड मोठ्या संख्येने निघालेल्या या मोर्चामुळे काही काळ जालना शहर थक्क झाल्याचं पाहायला मिळालं.







