मुंबई : मुंबईमधील माहिम मतदारसंघात तिरंगीच लढत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. आज उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस होता. माहिम मतदारसंघातून कोणता उमेदवार आपली उमेदवारी मागे घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. आज शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. परंतु राज ठाकरे यांनी नाकारली त्यांची भेट नाकारली. त्यानंतर सदा सरवणकर यांनी निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय कायम ठेवलाय. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. याची जाण ठेवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली होती. परंतु त्यांनी तेथून माघार घ्यावी, असंही विनंतीही सदा सरवणकर यांना केली होती. परंतु सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम होते. उलट अमित ठाकरे यांनीच उमेदवारी मागे घ्यावी, असं सरवणकर म्हणत होते.
माहिममधील हा तिढा सोडवण्यासाठी आज राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते. राज ठाकरे यांनी मोठेपणा दाखवत अमित ठाकरे यांची उमेदवारी मागे घेण्यास सांगून माझ्यासारख्या सामन्य कार्यकर्त्यावर न्याय करावा, अशी विनंतीही त्यांनी केली होती. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्याआधी माहिमचा तिढा सुटावा यासाठी सदा सरवणकर हे राज ठाकरेंच्या भेटीला आले होते. माहिम मतदारसंघाचे काही समीकरणे असून त्यामुळे अमित ठाकरे यांचा विजय होणं शक्य नसल्याचा दावा सरवणकर यांनी केला होता. हिच समीकरणे राज ठाकरे यांना समजून सांगण्यासाठी सरवणकर हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते. परंतु राज ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारली. आपल्याला बोलायचं नाही म्हणत राज ठाकरे यांनी राज ठाकरेंनी बोलण्यास नकार दिला. यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीच चर्चा झाली नसून सदा सरवणकर हे निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत.