• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मुंबई, ठाण्यावर सरकारचे लक्ष; आता रेशन आपल्या दारी योजना!

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 26, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या प्रलंबित सार्वत्रिक निवडणुका पावसाळय़ानंतर होण्याची शक्यता गृहीत धरून, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारही वेगवेगळय़ा योजनांच्या माध्यमांतून मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून याआधी सुरू केलेल्या शासन आपल्या दारी या योजनेनंतर आता रेशन आपल्या दारी हा नवा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून, या योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई व ठाणे महानगरपालिका क्षेत्रात फिरत्या वाहनांमधून शिधापत्रिकाधारक कुटुंबांना त्यांच्या घराजवळ अन्नधान्य उपलब्ध करून देणारी रेशन आपल्या दारी ही योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने मुंबई, ठाणे महापालिकांवर विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले जाते. राज्याचे अन्न व नागरीपुरवठा आणि ग्रांहक संरक्षणमंत्री रवींद्र चव्हाण यांनी, अशा प्रकारची नवीन योजना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले आहे.

राज्यात सध्या ५३ हजार शिधावाटप किंवा रास्तभाव दुकाने आहेत. तर शिधापत्रिकाधारकांची संख्या २ कोटी ४७ लाख ४१ हजार ७६४ इतकी आहे. परंतु सध्या रास्तभाव दुकानांमधून फक्त अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना केवळ गहू व तांदूळ एवढेच अन्नधान्य दिले जाते. राज्यात अंत्योदय शिधापत्रिकाधारकांची संख्या २४ लाख ४६ हजार ९८४ आहे. तर प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधाराकांची संख्या ८२ लाख ५७ हजार ७४३ आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना महिना ३५ किलो अन्नधान्य दिले जाते. प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना माणसी ५ किलो अन्नधान्य दिले जाते. राज्यात आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही रास्तभाव दुकानांमधून स्वस्त दरात अन्नधान्य पुरवठा केला जातो, त्यांची संख्या १० लाख २६ हजार १६५ इतकी आहे.

रास्तभाव दुकानांमधून पूर्वी केरोसिन विकले जात होते, परंतु ते आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी रास्तभाव दुकाने बंद आहेत, त्या भागातील शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या घराजवळ फिरत्या वाहनांमधून अन्नधान्य उपलब्ध करून देणारी रेशन आपल्या दारी ही योजना आहे. जवळच्या परिसरातील रास्तभाव दुकानादाराला फिरत्या वाहनांतून अन्नधान्य विक्रीला परवानगी दिली जाणार आहे. त्यातून त्याला अधिकचे कमिशन मिळणार आहे व शिधापत्रिकाधारकांची दूरच्या दुकानात धान्य आणण्यासाठी करावी लागणार पायपीट थांबणार आहे व त्यांचा वेळही वाचणार आहे. लवकरच या योजनेची अधिकृत घोषणा व अंमलबजावणी केली जाणार आहे.

Previous Post

सामाजिक न्याय दिनानिमित्त मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post

शासन आपल्या दारी कार्यक्रमाला या अन्यथा रेशनकार्डच रद्द करु ;मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी धमकीसत्र..- जयंत पाटील यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

शासन आपल्या दारी कार्यक्रमाला या अन्यथा रेशनकार्डच रद्द करु ;मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी धमकीसत्र..- जयंत पाटील यांचा आरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION