• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गॅलरी

अभिमानास्पद..! महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित

वर्ष-२०२२ चे क्रीडा पुरस्कार आणि वर्ष-२०२१ चे तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार प्रदान

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 1, 2022
in गॅलरी, पालघर, महाराष्ट्र, मुंबई, राष्ट्रीय, स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली  : क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या खेळाडूंना विविध श्रेणीतील राष्ट्रीय क्रीडा पुरस्काराने  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यामध्ये  वर्ष-२०२२ चे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आणि  वर्ष-२०२१ साठीचा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार  प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार   खेळाडूंचा यात समावेश आहे. क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य आजीवन पुरस्कार आणि शुभम वनमाळी यांना जल साहसासाठी वर्ष-२०२१ साठीचा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार  करण्यात आला.

केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात  केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री  निसिथ प्रमाणिक तसेच वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान करून खेळाडूंना गौरविण्यात आले.

दरवर्षी खेळाडूंच्या चमकदार कामगिरीसाठी केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात येतात.  यावर्षी १ खेळाडूला ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार’, २५ खेळाडूंना ‘अर्जुन पुरस्कार’ जाहीर झाले होते. यासह  ‘द्रोणाचार्य’ पुरस्कारामध्ये आ‍जीवन श्रेणीत ३ आणि नियमित द्रोणाचार्य पुरस्कारा’साठी ४   खेळाडूंना तसेच क्रीडा प्रशिक्षकांना पुरस्कार जाहीर झाले होते. याशिवाय ‘ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार’ देशातील ४ खेळाडूंना जाहीर झाले होते. ३ संस्थांना ‘राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार’, आणि गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसरला  ‘मौलाना अबुल कलाम आझाद ट्राफी’ ची घोषणा करण्यात आली होती.

 

क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांना ‘द्रोणाचार्य आजीवन ’ पुरस्कार प्रदान..

क्रिकेट क्षेत्रात प्रशिक्षक म्हणुन उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिनेश लाड यांना द्रोणाचार्य आजीवन पुरस्कार प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. मागील ३०  वर्षांपासून श्री लाड क्रिकेट प्रशिक्षक आहेत. मुंबईतील बोरीवलीतील श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल याठिकाणी श्री लाड यांची क्रिकेट अकादमी आहे.  त्यांच्या या अकादमीतून अनेक प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू आतापर्यंत तयार झालेले आहेत.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत जवळपास ९० च्या वर रणजीपटू तयार झाले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड यांच्या सह अनेक क्रिकेट खेळाडूंचे ते प्रशिक्षक आहेत.

मुंबईच्याच सुमा शिरूर यांना पॅरा नेमबाजी क्रीडा प्रकारात प्रशिक्षक म्हणुन द्रोणाचार्य पुरस्काराने (नियमित) आज गौरविण्यात आले. अग्नी रेखा, ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर, शाहु माने, आशिष चौकसे, सुनिधी चौव्हान, किरण जाधव, प्रसिद्धी महंत, अबनव शहा, आत्मिका गुप्ता, आकृती दहीया सारख्या ख्यातनाम खेळाडूंना त्यांनी प्रशिक्षित केलेले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना आज सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील 3 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार..

महाराष्ट्रामधून मल्लखांब या क्रीडा प्रकारासाठी सागर ओव्हळकर, अविनाश साबळे  यांना एथलेटिक्ससाठी, तर स्वप्निल  पाटील यांना पॅरा जलतरन क्षेत्रातील आतापर्यंच्या चमकदार कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला होता. मुंबईतील मल्लखांब चा उत्कृष्ट खेळाडू श्री ओव्हळकर यांनी लहान वयापासूनच मल्लखांब हा साहसी खेळ खेळायला सुरुवात केली. वर्ष-२०१९ मध्ये आयोजित जागतिक अजिंक्य पद  (चॅम्पियनशिप)  स्पर्धेत पोल मल्लखांब लॉन्ग सेट स्पर्धा, स्मॉल सेट स्पर्धा आणि रोप मल्लखांब लॉन्ग सेट या तीन्ही प्रकारात श्री ओव्हळकर यांनी सुवर्ण पदक पटकाविले आहे. तसेच २०१९ मध्येच  जागतिक अजिंक्य पद (चॅम्पियनशिप) स्पर्धेतील एकल प्रकारात रौप्य पदक पटकाविले आहे. विविध कसरती करण्यात श्री ओव्हळकर  अतिशय कुशल आहेत.  विविध स्पर्धांमध्ये महाराष्ट्रासह देशाचे नाव उंचावले आहे. त्यांच्या या कर्तबगारीसाठी  अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात आले.

बीडचे  एथलेटिक्स खेळाडू अविनाश साबळे यांनी राष्ट्रमंडळ क्रीडा स्पर्धा २०१९ मध्ये धाव स्पर्धेत पुरूषांच्या १ हजार मीटरची स्टीपल चेस स्पर्धा प्रकारात आणि वर्ष २०१९ मध्ये एशिया अजिंक्य पद (चॅम्पियनशिप) स्पर्धेत  ३ हजार मीटरची स्टीपल चेस प्रकारात श्री साबळे यांनी रौप्य पदक पटकावले आहे. त्यांच्या क्रिडा क्षेत्रातील या उत्तुंग कामगिरीसाठी त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोल्हापूरचे पॅरा जलतरनपटू स्वप्निल पाटील यांनी आशियाई पॅरा क्रिडा स्पर्धा वर्ष २०१८ मध्ये १०० मीटर ब्रेसस्ट्रोक एस १० या प्रकारात रौप्य पदक, १०० मीटर फ्री स्टॉईल एस १० स्पर्धेत कांस्य पदक आणि ४०० मीटर फ्री स्टॉईल एस १० मध्येही कांस्य पटकाविले होते त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

साहसिक जलतरणपटू शुभम वनमाळी यांना वर्ष २०२१  चा तेनजिंग नोर्गे साहस पुरस्कार..

पालघर जिल्ह्यातील साहसिक जलतरणपटू शुभम वनमाळी यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते वर्ष २०२१ साठी चा तेनजिंग नॉर्गे साहस पुरस्काराने गौरविण्यात आले. मांडवा जेटी ते एलिफंटापर्यंतचे २१ किलो मीटर समुद्रीमार्गाचे अंतर ५ तास, ४मिनीटे, ५ सेकंदात त्यांनी पूर्ण केले. यासह गेटवे ऑफ इंडिया ते डहानु बीचचे १४७ किलो मीटरचे अंतर २८ तास ४० मिनिटे, तसेच राजभवन ते गेटवे ऑफ इंडिया मधील १४ किलो मीटरचे अंतर ३ तास १३ मिनिटे १० सेकंदात पोहून पूर्ण  केलेले आहे.  श्री वनमाळी यांना महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०१८-१९ शिव छत्रपती राज्य साहस पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

Previous Post

पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.बाळासाहेब पाटील यांची मा.संपादक-श्री.राकेश गोरे सरांनी घेतली सदिच्छा भेट.

Next Post

महाराष्ट्र आणि ओंटारियो राज्य (कॅनडा) यांच्यात सामंजस्य करार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महाराष्ट्र आणि ओंटारियो राज्य (कॅनडा) यांच्यात सामंजस्य करार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,042)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (445)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (64)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (938)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,337)
  • मुंबई (3,056)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (400)
  • वसई-विरार (17)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (191)

Follow Us

Recent News

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

मुंबईत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकरे २५ हजारांपासून थेट ८० हजारांवर!

May 25, 2026
फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

फायनलच्या दिशेने चार संघ सज्ज; प्लेऑफमध्ये रंगणार हाय-व्होल्टेज सामने

May 25, 2026
दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

दिल्ली-मुंबई महामार्गामुळे पनवेलच्या ८ गावांचा होणार कायापालट

May 25, 2026
राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

राणीच्या बागेत आता सेल्फ सर्व्हिस तिकीट कियोस्क; रांगांशिवाय मिळणार तिकीट!

May 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION