• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुदतबाह्य खाद्यपदार्थांच्या तारखांमध्ये फेरफार करणारे रॅकेट उघड!

७५ लाखांचा संशयित साठा जप्त; दोन भागीदारांना ठोकल्या बेड्या

admin by admin
September 2, 2026
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
मुदतबाह्य खाद्यपदार्थांच्या तारखांमध्ये फेरफार करणारे रॅकेट उघड!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : तुर्भे औद्योगिक परिसरात मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील उत्पादन व मुदत समाप्तीच्या तारखांमध्ये फेरफार करून ते पुन्हा विक्रीसाठी तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) मदतीने केलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे ७५ लाख २१ हजार रुपयांचा संशयित खाद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेला २४ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक वसाहतीतील मे. साधना एंटरप्रायझेसच्या गोदामावर छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान खाद्यपदार्थांच्या पाकिटांवरील मूळ उत्पादन तारीख आणि मुदत समाप्तीची तारीख थिनरने पुसून त्यावर इंकजेट मशीनद्वारे नव्या तारखा छापल्या जात असल्याचे समोर आले. काही उत्पादनांवरील मूळ घटकांची माहिती आणि पोषणमूल्य झाकण्यासाठी स्टिकर्स लावल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात साठा असल्याने एफडीए अधिकाऱ्यांनी अनेक दिवस तपासणी करून एकूण ४,९४२ कार्टन्समधील मालाची मोजदाद केली. जप्त साठ्यात कुरकुरे, लेज, बिंगो, मॅगी नूडल्स, नॉर सूप, विविध मसाले, कसुरी मेथी, देगी मिरची, वाघ बकरी चहा, हेलमन्स मेयोनीज, तयार ग्रेव्ही तसेच थम्स अप, लिम्का आणि विना-लेबल सुकामेव्याचाही समावेश आहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एफडीएने साधना एंटरप्रायझेसचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे.

तपासात गोदामात १८ निर्यातदार कंपन्यांचा माल साठवलेला असल्याचे समोर आले असून त्यापैकी ११ निर्यातदारांच्या उत्पादनांवरील तारखांमध्ये फेरफार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित मालाची तपासणी अद्याप सुरू असून आणखी किती उत्पादनांमध्ये अशा प्रकारचा फेरफार झाला आहे, हे पुढील तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी साधना एंटरप्रायझेसचे भागीदार जयप्रकाश संचतीराम सिंग (२७) आणि जया नवरंग बहादूर सिंग (२६) यांना अटक करण्यात आली आहे. संबंधित निर्यातदारांच्या सूचनेनुसार मालावरील तारखांमध्ये बदल करण्यात आला होता का, तसेच हा संशयित माल देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविण्यात आला की परदेशात निर्यात करण्यात आला, याचाही गुन्हे शाखेकडून सखोल तपास सुरू आहे. या गैरप्रकारामागे केवळ गोदामातील फेरफार आहे की त्याची व्याप्ती आणखी मोठी असून इतर व्यापारी किंवा निर्यातदारही यात सहभागी आहेत, याचाही शोध घेतला जात आहे. जप्त केलेल्या मालाची पुरवठा साखळी, तो यापूर्वी बाजारात पोहोचला होता का आणि ग्राहकांपर्यंत किती प्रमाणात विक्री झाला, याबाबतही चौकशी सुरू आहे. ही धडक कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोदकुमार शेवाळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने केली असून या प्रकरणामुळे अन्नसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Previous Post

ठाण्यात गणेशोत्सव मंडप परवानग्यांचा संथ वेग; १७४ पैकी फक्त ९ अर्जांना मंजुरी!

Next Post

रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

admin

admin

Next Post
रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

रत्नागिरीतील प्रारूप मतदार यादीतून १ लाख ३१ हजार नावे गायब!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

September 3, 2026
महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 3, 2026
मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

September 2, 2026
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

September 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (57)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,113)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (486)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (107)
  • नाशिक (83)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,924)
  • मुंबई (3,426)
  • रत्नागिरी (52)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (517)
  • वसई-विरार (60)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

September 3, 2026
महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 3, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

नेपाळ दुर्घटनेतील मृतांची डीएनएद्वारे होणार ओळख; महाराष्ट्रातील नातेवाईकांना नमुने देण्याचे आवाहन

September 3, 2026
महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र-न्यू साउथ वेल्स भागीदारीला अधिक व्यापक, परिणामाभिमुख स्वरूप देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 3, 2026
मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

मंत्रालयातील बैठकांचा मेन्यू बदलला; चहा-बटाटेवड्यांना अखेर रामराम!

September 2, 2026
‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

‘ब्लिंकिट’ गोदामाचा पर्दाफाश; अस्वच्छतेमुळे परवाना तात्काळ निलंबित!

September 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION