• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू

admin by admin
August 22, 2026
in वसई-विरार
0
१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई-विरार शहरातील फेरीवाल्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वसई-विरार महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांना तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता अधिकृत ओळखपत्र दिले जाणार आहे. यासाठी येत्या १ सप्टेंबरपासून महापालिकेच्या प्रभाग समिती कार्यालयांमार्फत कागदपत्र पडताळणी आणि माहिती अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पात्र फेरीवाल्यांना अधिकृत ओळख मिळणार असून शहरातील फेरीवाला व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्यास मदत होणार आहे. वसई-विरार शहरातील बाजारपेठा, रस्ते, पदपथ तसेच विशेषतः रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या फेरीवाल्यांसोबतच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागांतून व्यवसायासाठी येणारे अनेक फेरीवालेही शहरातील गर्दीच्या ठिकाणी जागा व्यापत आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवास करताना अडचणी येत असून पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा मिळत नाही. तसेच वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारच्या पथविक्रेता अधिनियम २०१४ अंतर्गत वसई-विरार महानगरपालिकेने २०१४-१५ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणामध्ये शहरातील एकूण १५ हजार २१५ फेरीवाले पात्र ठरवण्यात आले होते. नियमानुसार सर्वेक्षणानंतर पात्र फेरीवाल्यांना ओळखपत्र देणे आणि त्यांच्यासाठी निश्चित फेरीवाला क्षेत्र तयार करणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या दहा वर्षांपासून ही प्रक्रिया रखडलेली होती. फेरीवाल्यांचे नियमन करण्याची नागरिकांची मागणी, तसेच विविध फेरीवाला संघटनांकडून करण्यात आलेली आंदोलने यामुळे आता महापालिकेने पात्र फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रक्रियेत संबंधित फेरीवाल्यांना आवश्यक कागदपत्रे प्रभाग समिती कार्यालयात जमा करावी लागणार आहेत. महापालिका अधिकारी या कागदपत्रांची तपासणी करतील. त्यानंतर फेरीवाला ज्या ठिकाणी व्यवसाय करतो त्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. सर्व तपासणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित फेरीवाल्याचा युनिक आयडी तयार करण्यात येईल आणि त्यानंतर अधिकृत ओळखपत्र वितरित केले जाणार आहे. महापालिकेने २०१५ च्या सर्वेक्षणात नोंद असलेल्या सर्व पात्र फेरीवाल्यांना वेळेत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन केले आहे. ओळखपत्र मिळाल्यानंतर फेरीवाल्यांना नियमानुसार व्यवसाय करता येणार असून प्रशासनालाही शहरातील फेरीवाल्यांची अचूक माहिती उपलब्ध होणार आहे. यामुळे अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणे आणि शहरातील वाहतूक व पादचारी व्यवस्था सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

ओळखपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे :
१) व्यवसायाच्या ठिकाणाचा फोटो
२) व्यवसाय करत असलेल्या ठिकाणचा पत्ता
३) आधार कार्ड आणि रहिवासी दाखला
४) दोन छायाचित्रे

Previous Post

पुण्यात ‘एमएच-१२’ मालिकेचा शेवट; नवीन वाहनांना आता ‘एमएच-६१’ नोंदणी क्रमांक

Next Post

FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

admin

admin

Next Post
FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

August 22, 2026
एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

August 22, 2026
FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

August 22, 2026
१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू

August 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,107)
  • गॅलरी (5)
  • जालना (6)
  • ठाणे (482)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (105)
  • नाशिक (79)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,032)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,869)
  • मुंबई (3,391)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (274)
  • रायगड (58)
  • राष्ट्रीय (509)
  • वसई-विरार (57)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

August 22, 2026
एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

August 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

पोलीस श्वानांची आयुष्यभराची जबाबदारी आता सरकार घेणार; निवृत्तीनंतरही संपूर्ण खर्च गृह विभाग उचलणार!

August 22, 2026
एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

एकीकडे १५०० रुपयांची मदत, दुसरीकडे महागाईचा भडका; ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ स्वयंपाकघरातील दरवाढीपुढे अपुरा

August 22, 2026
FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

FASTag च्या ३५० रुपयांच्या मासिक पासवर महिनाभर अमर्याद प्रवास!

August 22, 2026
१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू

१० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वसई-विरारमधील फेरीवाल्यांना मिळणार ओळखपत्र; १ सप्टेंबरपासून पडताळणी प्रक्रिया सुरू

August 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION