• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र वसई-विरार

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

दोन महिन्यांत ७ हजार रिक्षाचालकांची दिली मराठीची परीक्षा

admin by admin
July 30, 2026
in वसई-विरार
0
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षणाची अंतिम मुदत आता अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने वसई- विरार परिसरातील अमराठी रिक्षाचालकांचा मराठी शिकवणी वर्गांकडे मोठा ओढा वाढला आहे. राज्य शासनाने अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषेत संवाद साधणे अनिवार्य केल्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षण पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांत वसई- विरार परिसरातील सात हजारहून अधिक रिक्षाचालकांनी मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनाही वेळेत प्रशिक्षण मिळावे यासाठी अतिरिक्त प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्यास असूनही मराठीत संवाद न साधणाऱ्या रिक्षाचालकांचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर राज्य शासनाने परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून १ जूनपासून राज्यभर मराठी भाषा अभ्यास केंद्रे सुरू केली. या केंद्रांमध्ये रिक्षाचालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद कसा साधावा, याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जात आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे विनामूल्य असून प्रत्येक चालकासाठी चार तासांचे प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि नायगाव परिसरात परराज्यातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाल्याने अमराठी रिक्षाचालकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे या भागांमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्रांद्वारे मोठ्या प्रमाणावर मराठीचे धडे दिले जात आहेत. अंतिम मुदत जवळ आल्यामुळे जुलै महिन्याच्या उत्तरार्धात प्रशिक्षणासाठी रिक्षाचालकांची गर्दी लक्षणीयरीत्या वाढली आहे.

रिक्षाचालकांची वाढती संख्या आणि मर्यादित वेळ लक्षात घेऊन प्रशिक्षण व्यवस्थेतही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला वसई- विरार शहरात नऊ प्रशिक्षण केंद्रांद्वारे वर्ग घेतले जात होते. मात्र, वाढत्या प्रतिसादामुळे गोंसालो गार्सिया महाविद्यालयासह अन्य ठिकाणी अतिरिक्त प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. तसेच पूर्वी सात दिवस चालणारे प्रशिक्षण आता दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल, अशा पद्धतीने वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती या उपक्रमाच्या पालघर जिल्हा समन्वयक सीमा पाटील यांनी दिली. परवाना रद्द होण्याची भीती आणि शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यासाठी मोठ्या संख्येने रिक्षाचालक मराठी भाषा शिकण्यास पुढे येत आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चालकांची तोंडी परीक्षा घेतली जात असून, गेल्या दोन महिन्यांत सात हजारांहून अधिक रिक्षाचालकांनी प्रशिक्षणासह ही परीक्षा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या उपक्रमामुळे रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यातील संवाद अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून, मराठी भाषेचा दैनंदिन व्यवहारातील वापर वाढण्यासही हातभार लागणार आहे. शासनाच्या या उपक्रमाला वसई- विरार परिसरात चांगला प्रतिसाद मिळत असून, अंतिम मुदतीपूर्वी आणखी मोठ्या संख्येने रिक्षाचालक प्रशिक्षण पूर्ण करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

Next Post

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

admin

admin

Next Post
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,097)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,022)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,744)
  • मुंबई (3,314)
  • रत्नागिरी (50)
  • राजकीय (271)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (486)
  • वसई-विरार (50)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

रत्नागिरीत २५ कोटींचे अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय; जागतिक स्तरावर मराठीला मिळणार नवी ओळख

July 30, 2026
१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

१५ ऑगस्टची मुदत जवळ; वसई-विरारमध्ये अमराठी रिक्षाचालक गिरवतायत मराठीचे धडे!

July 30, 2026
पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

पार्थ पवार-कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा; राजकीय दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला कौटुंबिक सोहळा

July 30, 2026
लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

लालबागच्या गणेश गल्लीत ‘मुंबईच्या राजा’चा पाद्यपूजन सोहळा संपन्न; ९९ व्या वर्षात पदार्पण!

July 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION