• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

खाकी वर्दीचा गैरवापर करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद! नाशिक पोलिसांकडून ७० लाखांच्या लुटीचा छडा

admin by admin
July 15, 2026
in गुन्हेगारी, नाशिक
0
खाकी वर्दीचा गैरवापर करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद! नाशिक पोलिसांकडून ७० लाखांच्या लुटीचा छडा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नाशिक : भरदिवसा स्वतःला पोलीस असल्याची बतावणी करत बंदुकीचा धाक दाखवून ७० लाख रुपयांची रोख रक्कम लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने एका महिलेसह चार आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ८२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पंचवटी परिसरातील दिंडोरी रोड येथे काही आरोपी सरकारी दिवा लावलेल्या इनोव्हा कारमधून आले आणि त्यांनी स्वतःची ओळख पोलीस अधिकारी म्हणून करून दिली. त्यानंतर त्यांनी तक्रारदाराला बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीने कारमध्ये बसविले. कारमध्येच त्याच्याकडील पिशवीतील ७० लाख रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल फोन हिसकावून घेतला. तसेच जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ करून तक्रारदाराला मुंबई–पुणे महामार्गावर सोडून आरोपी पसार झाले. या घटनेनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गंभीर स्वरूपाचा हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वात सात विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली. मानवी माहिती, तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान एका आरोपीची ओळख पटल्याने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. रेल्वेमार्गे नाशिक रोड स्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला, मात्र आरोपी मुंबईकडे परतल्याने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई-विरार परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.

सातत्यपूर्ण पाठलाग आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अखेर उमाशंकर वर्मा (४०, उत्तर प्रदेश), सुजितकुमार दुबे (३२, झारखंड), निलेश पका (२७, वसई) आणि संगीता अहिरे (४३, नाशिक) यांना अटक केली. आरोपींकडून ५५ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली सरकारी दिवा असलेली गोल्डन इनोव्हा कार, एक बंदूक, एक अग्निशस्त्र तसेच विविध बनावट शासकीय कागदपत्रे जप्त करण्यात आली. यामध्ये आयकर विभाग, गृह विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि रेल्वे विभागाची बनावट ओळखपत्रे, बनावट रेल्वे पास तसेच विविध सरकारी विभागांचे बनावट रबरी शिक्के यांचाही समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ८२ लाख १० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासात तक्रारदाराकडे मोठ्या प्रमाणात रोख रक्कम असल्याची माहिती आरोपींना आधीपासूनच मिळाल्याचे समोर आले असून, त्यानुसार त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने दिंडोरी रोडवर सापळा रचून दरोडा टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्य आरोपी उमाशंकर वर्मा हा सराईत गुन्हेगार असून, त्याचे इतर आरोपींशी संबंध कसे प्रस्थापित झाले आणि या टोळीने यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. गुन्ह्यात वापरलेल्या वाहनांची छायाचित्रेही पोलिसांनी प्रसिद्ध केली असून, अशा प्रकारे फसवणूक किंवा लूट झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे.

Previous Post

ओमानजवळ जहाजावरील हल्ल्यात पुण्याच्या अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

Next Post

कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट!

admin

admin

Next Post
कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट!

कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट!

कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट!

July 15, 2026
खाकी वर्दीचा गैरवापर करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद! नाशिक पोलिसांकडून ७० लाखांच्या लुटीचा छडा

खाकी वर्दीचा गैरवापर करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद! नाशिक पोलिसांकडून ७० लाखांच्या लुटीचा छडा

July 15, 2026
ओमानजवळ जहाजावरील हल्ल्यात पुण्याच्या अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

ओमानजवळ जहाजावरील हल्ल्यात पुण्याच्या अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

July 15, 2026
नो सिग्नलचा त्रास संपला! ‘मेट्रो ३’ च्या भुयारी मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

नो सिग्नलचा त्रास संपला! ‘मेट्रो ३’ च्या भुयारी मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

July 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (52)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,088)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (470)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (98)
  • नाशिक (74)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,003)
  • पुणे जिल्हा (203)
  • महाराष्ट्र (1,657)
  • मुंबई (3,264)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (268)
  • रायगड (51)
  • राष्ट्रीय (462)
  • वसई-विरार (38)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (19)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट!

कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट!

July 15, 2026
खाकी वर्दीचा गैरवापर करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद! नाशिक पोलिसांकडून ७० लाखांच्या लुटीचा छडा

खाकी वर्दीचा गैरवापर करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद! नाशिक पोलिसांकडून ७० लाखांच्या लुटीचा छडा

July 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट!

कोस्टल रोड बोगद्यात धावत्या कारने घेतला अचानक पेट!

July 15, 2026
खाकी वर्दीचा गैरवापर करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद! नाशिक पोलिसांकडून ७० लाखांच्या लुटीचा छडा

खाकी वर्दीचा गैरवापर करत दरोडा टाकणारी टोळी जेरबंद! नाशिक पोलिसांकडून ७० लाखांच्या लुटीचा छडा

July 15, 2026
ओमानजवळ जहाजावरील हल्ल्यात पुण्याच्या अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

ओमानजवळ जहाजावरील हल्ल्यात पुण्याच्या अभियंता हेरंब करमरकर यांचा मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर!

July 15, 2026
नो सिग्नलचा त्रास संपला! ‘मेट्रो ३’ च्या भुयारी मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

नो सिग्नलचा त्रास संपला! ‘मेट्रो ३’ च्या भुयारी मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

July 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION