• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!

admin by admin
June 26, 2026
in ठाणे, महाराष्ट्र
0
शिळफाटा-खिडकाळीतील अनधिकृत गोदामांवर महापालिकेचा बुलडोझर; तीन दिवसांत ११३ गोदामे जमीनदोस्त!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : शिळफाटा आणि खिडकाळी परिसरातील गोदामांना वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांनंतर ठाणे महापालिकेने अनधिकृत गोदामांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. अलीकडे झालेल्या महापालिकेच्या महासभेत या भागातील बेकायदा गोदामे, अनधिकृत बांधकामे, अग्निसुरक्षा परवानगीचा अभाव आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर महापालिकेने तातडीने निष्कासन मोहीम हाती घेत तीन दिवसांत तब्बल ११३ अनधिकृत गोदामे जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईमागे परिसरातील वाढत्या आगीच्या घटना, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम ही प्रमुख कारणे असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नगरसेवकांनी सभागृहात ग्रीन झोन, उद्यान आरक्षण तसेच शैक्षणिक आरक्षण असलेल्या जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे उभारण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला. या बांधकामांमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून महापालिकेच्या महसुलालाही फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय अनेक गोदामांमध्ये साठवण्यात येणारी रसायने नैसर्गिक जलप्रवाहात सोडली जात असल्याने परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांचे पाणी दूषित होत असून नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब चर्चेत मांडण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिवा प्रभाग समिती क्षेत्रात विशेष सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम सुरू करण्यात आली. शनिवारी सुरू झालेली ही मोहीम रविवारी सुट्टीच्या दिवशीही थांबविण्यात आली नाही आणि सोमवारीही अखंडपणे सुरू ठेवण्यात आली.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच भंगार साठवणूक करणाऱ्या गोदामांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संभाव्य आगीचे धोके टाळण्यासाठी अशा गोदामांना प्राधान्य देत कारवाई केली जात आहे. शासकीय तसेच विविध आरक्षित भूखंडांवर उभारण्यात आलेल्या सुमारे ८५० अनधिकृत गोदामांचे सर्वेक्षण सुरू असून, नियमबाह्य आढळणाऱ्या सर्व गोदामांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त दीपक झिंजाड यांनी दिली. ही मोहीम पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मनसेचे शिळ-देसाई विभागाध्यक्ष शरद पाटील यांनी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रशासक राजवटीच्या काळात सरकारी जागा, आरक्षित भूखंड आणि विविध मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे उभी राहिली असून, खान कंपाऊंड, आचार गल्ली, महापे रोड परिसर तसेच शिळ-दिवा मार्गालगत शेकडो बेकायदा गोदामे अद्याप अस्तित्वात असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, कारवाई केवळ निवडक ठिकाणांपुरती मर्यादित का ठेवली जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच संपूर्ण परिसरातील अनधिकृत गोदामांची यादी जाहीर करून कारवाईची माहिती पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली. महापालिका आयुक्त सौरभ राव आणि अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशानुसार उपायुक्त जितेंद्र निकम, उपायुक्त दीपक झिंजाड, दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे तसेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलिस बंदोबस्ताच्या उपस्थितीत ही मोहीम सुरू असून, पुढील काळातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Previous Post

भोंदूबाबा अशोक खरातचा काळा कारनामा मोठ्या पडद्यावर! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा

Next Post

भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

admin

admin

Next Post
भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

भिवंडीतील अमेझॉनच्या गोदामावर FDAची धाड; दीड टन कालबाह्य अन्नसाठा जप्त, परवाना निलंबित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (64)
  • पालघर (43)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION