नवी मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. यात विशेषत महानगरपालिकेच्या मराठी शाळा वाचवण्याची मागणी वेळोवेळी करत असताना,नुकत्याच समोर आलेल्या निर्णयामुळे सर्वांजण अवाक् झालेले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने शहरात असलेल्या सर्व महापालिका शाळा आता टप्प्याटप्प्याने इंग्रजी माध्यमांत बदलण्याचा निर्णय घेतलेला असून याबाबतचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आलेला आहे. सभागृह नेते सागर नाईक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवणे तसेच त्यांच्या शैक्षणिक आणि त्यांना करिअर संधी वाढवणे हा या मागील मुख्य हेतू आहेत शिवाय जे खाजगी शाळांपुरते मर्यादित असलेले इंग्रीजी माध्यमाचे शिक्षण हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाही उपलब्ध करुन देण्याचा हा एक प्रयत्न असेल. शाळांबाबत घेतलेला निर्णय सुरळीत पार पडावा यासाठी तो टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. पहिल्यांदा नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यम सुरु करता येईल आणि सध्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे त्यांच्या सध्याच्या माध्यमातच सुरु राहणार आहे. याचा निर्णयामुळे महापालिका आणि खाजगी शाळांमध्ये असलेली दरी ही कमी होईल शिवाय आर्थिकदृष्टया दुर्बल आणि मध्यमवर्गीय घरातील कुटुंबीयांतील विद्यार्थ्यांना समान दर्जाचे शिक्षणही मिळेल.







