सोलापूर : सोलापुरात रविवारी महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ या वृद्ध पती पत्नीचा संशयास्पदरित्या राहत्या घरी मृतदेह आढळला होता. एमआयडीसी पोलिसांनी कसून तपास करत, या खुनाचा छडा लावला. रंगम्मा मंचाळ आणि महादेव मंचाळ या दोघा वृद्ध पती पत्नीला सख्ख्या दोन पुतण्यानी ठार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी राहुल रामचंद्र मंचाळ (वय २६) आणि विकास रामचंद्र मंचाळ (वय २३ वर्षे)या दोघांना अटक केले आहे.पोलिसांनी राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ यांना ताब्यात घेत चौकशी केली, पोलिसी खाख्या दाखवताच जागेच्या कारणावरून वृद्ध काका काकीला ठार केले असल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना दिली आहे.दोघा पुतण्यानी अतिशय थंड डोक्याने वृध्द काका काकीला उशिने तोंड दाबून ठार केले, त्यानंतर अंघोळ केली आणि रवाना झाले.एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे आणि पोलीस निरीक्षक विजय खोमणे यांनी व यांच्या टीमने या खुनाचा छडा लावला आहे.
प्रॉपर्टीच्या वादातून अर्धांगवायू झालेले काका महादेव नरसप्पा मंचाळ (वय ६८) व काकू रंगम्मा महादेव मंचाळ (६२, रा. कृष्णानगर, कुमठा नाका सोलापूर) यांचा खून पुतण्यांनीच केल्याचे तपासात उघडकीस आली आहे. राहुल रामचंद्र मंचाळ (२६), विकास रामचंद्र मंचाळ (२३, रा. हैद्राबाद) असे त्या आरोपींची नावे आहेत. महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ यांच्या सोबत प्रॉपर्टीच्या वादातून रामचंद्र मंचाळ आणि त्यांची दोन मुलं राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ यांच्यासोबत नेहमी खटके उडत होते. कुमठा नाका परिसरात असलेल्या कृष्णा नगर येथे असलेली घर जागा पुतणे मागत होते. रंगम्मा मंचाळ आणि महादेव मंचाळ विरोध करतायत याचाच राग मनात धरून पुतण्यानी वृद्ध काका काकीला ठार केले. ‘बीएसएनएल’मधून निवृत्त झालेले महादेव मंचाळ व त्यांची पत्नी रंगम्मा मंचाळ या दोघांचा पुतण्यानी खून केला आहे. राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ या दोन पुतण्यानी अतिशय थंड डोक्याने शनिवारी मध्यरात्री काका काकीच्या रूम मध्ये शिरले. उशी सदृश मऊ कापडाने दोघांचे तोंड दाबून त्याचा खून केला.त्याच घरात अंघोळ केली.आणि रात्रीच निघून गेले.मयत महादेव यांचे बंधू निळकंठ मंचाळ यांनी शनिवारी फोन केला असता, फोन उचलला नव्हता.रविवारी सकाळी फोन बंद दाखवला.निळकंठ मंचाळ यांनी ताबडतोब मित्राला कृष्णा नगर येथील घरी पाठविलं आणि हा दुहेरी हत्याकांड उघडकीस आला. एम आय डी सी पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा तपास केला. कौटुंबिक माहिती घेतली असता, भावकित वाद असल्याचे समोर आले. संशयित आरोपीचे रामचंद्र मंचाळ हे बालाजी (आंध्रप्रदेश)येथे गेले असल्याची माहिती मिळाली. रामचंद्र मंचाळ यांच्या दोन्ही मुलांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी रामचंद्र मंचाळ यांना ताब्यात घेतले. मुलांना फोन करून सोलापुरात बोलावले, राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ सोलापुरात दाखल होताच पोलिसांनी ताबडतोब त्यांना ताब्यात घेतले.






