मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखकर होणार आहे. मुंबईतील ‘जल मेट्रो’चा विस्तार केला जातोय. कोची मेट्रोच्या धर्तीवर १० नवीन जलमार्गांचा सविस्तर आराखडा अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मुंबई, ठाणे, कल्याण आणि वसई-विरार जलमार्गाने जोडले जातील. सध्या ८५ किमीचे २१ मार्ग सुरू असून, नवीन मार्गांमुळे हे जाळे २०० किमीपर्यंत विस्तारणारेय. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून हा पर्यावरणपूरक प्रकल्प राबवला जाणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील गर्दी कमी होणार आहे.
- नारंगी – खारवाड़ेश्वरी
- वसई – मीरा भाईंदर – घोडबंदर (गायमुख) – नागले
- कोलशेत – काल्हेर – मुंब्रा – कल्याण
- कल्याण – मुंब्रा – मुलुंड – ऐरोली – वाशी – गेटवे ऑफ इंडिया
- मुलुंड – ऐरोली – गेटवे ऑफ इंडिया
- मीरा भाईंदर – वसई – बोरिवली – नरिमन पॉइंट – मांडवा
- बेलापूर – गेटवे ऑफ इंडिया – मांडवा
- बोरिवली – गोराई – नरिमन पॉइंट.







