मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) हे मुंबईतील प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख सरकारी आयोजनाचे ठिकाण असून यंदा महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत राष्ट्रध्वज तिरंगा फडकवतील आणि परेड तसेच उपस्थित जनसमुदायाला संबोधित करतील या कार्यक्रमात मुख्यमंत्री, उच्च अधिकारी, पोलिस आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत . प्रजासत्ताक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मैदानात दरवर्षी पथ संचलन आणि परेड आयोजित केली जाते.
- मुंबई पोलिस बँड आणि विविध सुरक्षा विभाग
- अग्निशमन दल
- मुंबई पोलिस वाहन विभाग
- होमगार्ड
- कोस्ट गार्ड
- रेल्वे पोलिस
- एसटी महामंडळ सुरक्षा रक्षक
- मंत्रालयातील अल्पसंख्यांक विभाग , वस्त्रोद्योग विभाग , सुरक्षा दल व मैदानात फिरणारी अन्य विभागाची चित्ररथ सहभागी होतात आणि हीच चित्ररथ मैदानावर विशेष आकर्षण असते
परेड मध्ये जवान आणि विद्यार्थी ओळीने राष्ट्रध्वजाला सलामी देतात. बघणार्यांसाठी हे फार मनोरंजक दृश्य असते. परेड मध्ये सहभागी चित्ररथ म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील प्रमुख कलात्मक प्रदर्शन असून ते राज्यसंस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वारसा आणि सामाजिक संदेशांचे दर्शन घडवतात. यंदाचे चित्ररथ सुद्धा रंगबेरंगी, कलात्मक आणि विविध थीमवर आधारित रथ असून समाजाला एक दिशा नक्की देतील, लोकांना विचार करायला भाग पाडतील आणि समाजामध्ये देशप्रेमाची जनजागृती होईल तसेच महाराष्ट्रात होत असणाऱ्या कामाविषयी लोकांना पूर्ण माहिती मिळेल अशी आशा बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मैदानात चित्ररथ बनविणाऱ्या टीम चे कला दिग्दर्शक नितीन शिंदे यांनी नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली आहे.







