मुंबई : नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळीत लाखो प्रवाशांना रेल्वेने प्रवास केला. लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवासी प्रवास करत असतात. दरम्यान,दिवाळीत खूप जास्त गर्दी होते.त्यामुळे रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी होते. अनेकदा रेल्वे उशिराने येतात किंवा रद्द होतात. या काळात प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. दरम्यान, आता रेल्वे प्रवाशांसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. महाराष्ट्रात मुंबईसह एकूण ८ रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. देशातील एकूण ७६ टर्मिनसवर हा होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिवाळी, छठ पूजा, दसरा या कालावधीत लाखो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. दरम्यान, अनारक्षित ट्रेनसाठी टर्मिनसवर खूप गर्दी होते. या प्रवाशांना थांबण्यासाठी होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. जेणेकरुन प्लॅटफॉर्मवर जास्त गर्दी होणार नाही. यंदा दिवाळी आणि छठपूजेसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी दिल्ली रेल्वे स्थानकावर होल्डिंग एरिया तयार केला होता. यामुळे खूप फायदा झाला. याच पार्श्वभूमीवर ७६ टर्मिनसवर होल्डिंग एरिया तयार केला जाणार आहे. होल्डिंग एरिया म्हणजे प्रवाशांनी थांबण्यासाठीचे ठिकाण. या ठिकाणी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स असतील. याचसोबत शौचालय, मेडिकल बूध, मदत कक्ष, प्रवाशांनी थांबण्याची व्यवस्था केली जाईल. हा होल्डिंग एरिया छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर देखील उभारण्यात येणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनल, नागपूर, नाशिक रोड, पुणे, दादर, मुंबई सेंट्रल आणि वांद्रे या ठिकाणी होल्डिंग एरिया उभारण्यात येणार आहे.







