एअर इंडियाच्या विमानात पुन्हा एकदा तांत्रिक अडचण आल्याचे समोर आले आहे. हाँगकाँगहून दिल्लीला येणाऱ्या बोईंग ७८७-७ या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान पुन्हा एकदा हाँगकाँगला रवाना झाला आहे. एअर इंडिया बोईंग विमान फ्लाईट क्रमांक एआय ३१५ मध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे परतले आहे. विमानात २०० पेक्षा जास्त प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
हाँगकाँगहून दिल्लीला रवाना झालेले एअर इंडिया फ्लाइटला टेकऑफनंतर काही वेळातच परत हाँगकाँगच्या विमानतळावर परतले. तांत्रिक समस्येमुळे परत यावे लागल्याची माहिती मिळत आहे. बोईंग 787-8 ड्रीमलाइनरद्वारे चालवले जाणारे फ्लाइट AI315 नियोजित वेळेनुसार हॉंगकॉंगहून निघाले होते. पण पायलटला सिस्टममध्ये बिघाडाची शक्यता दिसली. त्यामुळे विमान मध्येच माघारी परतले. विमान सुखरूप हाँगकाँगमध्ये उतरले आणि सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सध्या विमानाची तपासणी करण्यात येत असून नेमकं कारण शोधलं जात आहे.







