• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

ठाणे महापालिका आयुक्तांचे आदेश; अतिधोकादायक इमारतींचा पाणी, वीज पुरवठा खंडीत करा

ठाणे शहरातील अतिधोकादायक इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याबरोबरच मलनि:सारण वाहिन्या तत्काळ तोडून टाकण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 15, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : शहरातील अतिधोकादायक इमारतींचा वीज, पाणी पुरवठा खंडीत करण्याबरोबरच मलनि:सारण वाहिन्या तत्काळ तोडून टाकण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. इमारत अतिधोकादायक असल्याचे पालिका प्रशासनाने घोषित केल्यानंतरही अशा इमारतींमध्ये नागरिक वास्तव्य करीत असून पावसाळ्यात इमारती कोसळून दुर्घटना होऊ नये म्हणून आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. याशिवाय, स्थिरता प्रमाणपत्र नसलेली तसेच जास्तीचे आकारमान असलेली जाहिरात फलक तत्काळ उतरवा आणि रस्त्यावरील खड्डे भरणे, झाडाच्या फांद्या उचलणे ही कामे २४ तासांत व्हायला पाहिजेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मान्सूनसाठी तयारीच्या दृष्टीने मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सौनिक यांनी दिलेले निर्देश, तसेच लोकप्रतिनिधी, नागरिकांनी केलेल्या तक्रारी या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व उपनगर अभियंता, सर्व सहाय्यक आयुक्त, आरोग्य अधिकारी, वृक्ष अधिकारी, सर्व कार्यकारी अभियंता यांची बैठक घेतली. महापालिका क्षेत्रात एकूण ९६ अतिधोकादायक इमारती (सी -१ वर्गवारी) आहेत. त्यापैकी, ३७ इमारतीत नागरिक राहत आहेत. त्यात, नौपाडा आणि कोपरी २७, माजिवडा १, उथळसर ३, कळवा २, मुंब्रा ४ अशा इमारतींचा समावेश आहे. या सर्व इमारतींचा पाणी, वीज खंडीत करण्याबरोबरच मलनिःसारण जोडणी तोडून या इमारती रिकाम्या करून घ्याव्यात, असे आदेश आयुक्त राव यांनी दिले.

नागरिकांच्या जिविताचा प्रश्न असल्याने आता चर्चा करण्यात वेळ दवडू नये. नागरिकांची समजूत काढून त्यांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. पावसाचा जोर कधीही वाढू शकतो, याची जाणीव सगळ्यांनी ठेवावी, असेही आयुक्त राव म्हणाले. पुढील दोन दिवसात सहाय्यक आयुक्तांनी त्यांच्या विभागातील अतिधोकादायक (सी -१) आणि धोकादायक (सी २ ए) अशा सर्व इमारतींची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि रहिवाशांना तेथून स्थलांतरित होण्यासाठी संवाद साधावा, असेही निर्देश आयुक्त राव यांनी दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना हलविण्याची वेळ आली तर आपल्या संक्रमण शिबिरामध्ये पाणी, वीज आणि स्वच्छता राखली जाईल, हे पाहावे. नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. पाणी साठणाऱ्या सखल भागातील १४ मोक्याच्या ठिकाणी ६३ पंप आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबतच, स्थानिक तरुणांना स्वयंसेवक म्हणून सोबत घ्यावे. त्यांना ओळखपत्र, जॅकेट देण्यात यावे. त्यांच्या मदतीमुळे आपत्कालीन स्थितीत नागरिकांपर्यंत जाणे शक्य होईल, असेही त्यांनी सांगितले. खाडीच्या मुखापाशी कचरा साठून ते पाणी नाल्यात पाठीमागे येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी खाडी मुखांपाशी नाल्यांची स्थिती कशी आहे ते पाहून तेथे स्वच्छता करण्यात यावी. गटारांची झाकणे वरचेवर पाहणी करून सुस्थिती राहतील, याची खबरदारी घ्यावी. तसेच, रस्त्यावर साचणारे पाणी पर्जन्यजलवाहिन्यांमध्ये व्यवस्थित वाहून जाईल, तेथे कचरा, माती साचणार नाही, याचीही काळजी घ्यावी, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. नाल्यातील तरंगता कचरा दररोज साफ केला जावा. त्याचप्रमाणे, किती ठिकाणी सफाई झाली याचा दैनंदिन अहवाल सादर करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. नागरिकांनी पावसाळ्यात घरामध्ये कोणतीही मोठ्या स्वरुपाची दुरुस्ती करू नये. सोसायट्यांनी अशा दुरुस्तीसाठी परवानगी देवू नये. त्याचबरोबर, व्ह्यायब्रेटर सारख्या उपकरणाचा वापर निरीक्षकांच्या देखरेखीत करावा. काही इमारतींच्या दुरुस्तीच्या कामात नियमांची पायमल्ली केली जात असल्याने दुर्घटना घडत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

Previous Post

शालेय विद्यार्थ्यांना लवकरच दर्जेदार एकसमान गणवेश देणार शालेय शिक्षण विभागाचे स्पष्टीकरण

Next Post

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून मुंबईत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION