• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

कल्याणच्या पादचारी पुलावरुन ८ महिन्यांच्या बाळाची चोरी; अवघ्या ६ तासांच्या आत आरोपींना अटक

admin by admin
November 5, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
कल्याणच्या पादचारी पुलावरुन ८ महिन्यांच्या बाळाची चोरी; अवघ्या ६ तासांच्या आत आरोपींना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कल्याण : कल्याण रेल्वे स्टेशनच्या पादचारी पुलावर झोपलेल्या एका मजुराच्या कुटुंबातून ८ महिन्यांच्या बाळाची चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने, कल्याण रेल्वे पोलिस आणि महात्मा फुले पोलिसांनी अवघ्या ६ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावत, बाळाची सुटका केली आणि आरोपी तरुण अक्षय खरेसह त्याची आत्या सविता खरे या दोघांना बेड्या ठोकल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पुण्याहून आलेले नीलेश कुंचे आणि त्यांची पत्नी पूनम पोंगरे हे मोलमजुरी करणारे कुटुंब होते. कामाच्या शोधात ते २ नोव्हेंबरला कल्याणला आले, पण त्यांना काम किंवा राहण्यासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे ते आपल्या ३ मुलांसह कल्याण स्टेशनवरील एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणाऱ्या पादचारी पुलावर झोपले होते.

सकाळी ४ वाजण्याच्या सुमारास एक तरुण पुलावर आला. त्याने झोपलेल्या कुंचे कुटुंबाकडे पाहिले आणि इकडे-तिकडे नजर टाकली. संधी साधून, त्याने झोपलेल्या ३ मुलांपैकी सर्वात लहान असलेल्या ८ महिन्यांच्या बाळाला उचलले आणि तेथून सिंडीकेट परिसराच्या दिशेने निघून गेला. सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास नीलेश आणि पूनम पोंगरे झोपेतून जागे झाले, तेव्हा त्यांच्याजवळ झोपलेल्या ३ मुलांपैकी ८ महिन्यांचे बाळ गायब असल्याचे पाहून त्यांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने बाळाचा आजूबाजूला शोध घेतला, पण बाळ कुठेही सापडले नाही. सकाळी ६.३० वाजता, त्यांनी कल्याण जीआरपी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि बाळाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, कल्याण रेल्वे पोलिसांच्या सोबत महात्मा फुले पोलिसांनीही तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी विकास मडके यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.

पोलिसांनी घटनास्थळावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. फुटेजमध्ये अक्षय खरे हा तरुण बाळाला घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत होता. सीसीटीव्ही आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 6 तासांच्या आत आरोपीला सिंडीकेट परिसरामध्ये शोधून काढले. बाळाची चोरी करणारा आरोपी तरुण अक्षय खरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासामध्ये अक्षयची आत्या सविता खरे हीचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे तिलाही अटक करण्यात आली आहे. बाळाला विकण्याच्या उद्देशानेच ही चोरी केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र अक्षय खरे चोरी करण्यामागील नेमके कारण सांगत नसल्यामुळे पोलिस अधिक तपास करत आहेत.

Previous Post

शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाला धक्का; बड्या नेत्याने सोडली साथ!

Next Post

शिट्टीचा आवाज घुमणार: तब्बल ७ महिन्यांनंतर नेरळ–माथेरान मिनी ट्रेन धावणार पर्यटकांच्या सेवेत!

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,035)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (43)
  • पालघर (60)
  • पुणे (917)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,255)
  • मुंबई (3,006)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांची मोठी कामगिरी; ७.८७ कोटींचा मुद्देमाल मालकांना परत

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION