मुंबई : महाराष्ट्र निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) दिग्गज नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर कारवाई मोठी करण्यात आलीय. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केलीय. निवडणूक आयोगाने आता लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केलाय. तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान विनोद तावडे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलंय. त्याच्याविरोधात कट रचण्यात आला असून निवडणूक आयोगाने निष्पक्ष चौकशी केली पाहिजे. मी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो, मी काही चुकीचं केलं नाहीये. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कट रचला असल्याचा आरोप विनोद तावडेंनी आपल्या स्पष्टीकरणात केलाय. आता पोलीस आणि निवडणूक आयोगाने याचा तपास करावा असं तावडे म्हणालेत. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटण्याचा आरोप होत आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आरोप केलाय की, तावडे एका हॉटेलमध्ये विनोद तावडे पाच कोटी रुपये घेऊन आलेत. ते पैसे मतदारांना वाटण्यासाठी दिले जात होते. त्या आरोपांवर विनोद तावडे म्हणाले, मला आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, सीसीव्हीटी फुटेज काढून त्याच्यावरून तपास करण्यात यावी.