नागपूर : गेल्या १८ वर्षांपासून अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कारागृहाच्या मागच्या गेटने मीडियापासून लपवत पोलिसांनी अरुण गवळीची सुटका केली. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर आज त्याची सुटका करण्यात आली. मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली होती. अरुण गवळी २००४ मध्ये मुंबई विधानसभा मतदारसंघातून आमदारही झाले. २०१२ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने २००७ मध्ये मुंबई शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नंतर त्यांना नागपूर तुरुंगात पाठवण्यात आले. न्यायालयाने त्यांना १७ लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
न्यायाधीश एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना त्याचा दीर्घ तुरुंगवास आणि त्याचे वय विचारात घेतले. त्यानंतर, न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाने ठरवलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून गवळीला जामीन मंजूर केला. गेल्या १८ वर्षांपासून तो जामिनासाठी प्रयत्न करत होता. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यामुळे त्यांची सुटका करण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या खटल्यात गवळी यांची बाजू अॅड. शंतनु आडकर यांनी मांडली. कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येच्या प्रकरणात अरुण गवळी यांना अटक झाली होती. त्यावेळी ते आमदार होते. त्यानंतर या प्रकरणात त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. एका राजकीय नेत्याच्या खूनप्रकरणी आमदाराला झालेली ही शिक्षा त्यावेळी मोठ्या चर्चेचा विषय ठरली होती.