मुंबई : शिवसेनेने शिवाजी पार्क मैदानासाठीचा आपला अर्ज मागे घेतल्यानंतर गुरुवारी मुंबई महापालिकेने विविध अटी, शर्ती घालून शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे. २४ ऑक्टोबरला दसरा असून, सभेच्या आयोजनासाठी आज, शुक्रवारपासून तयारी सुरू करणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानाचा आग्रह कायम ठेवल्यास वादविवाद होण्याची शक्यता असल्याचा दावा करत शिवसेनेने या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. शिवसेनेने आझाद मैदान व क्रॉस मैदान हे दोन पर्याय सभेसाठी ठेवले असून, यापैकी कुठे सभा घ्यायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. दरम्यान, मेळाव्यासाठी अधिकृतपणे परवानगी देणारे पत्र पालिकेच्या ‘जी/उत्तर’विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी शिवसेना सचिव अनिल देसाई यांना दिले आहे.
या नियमांचे पालन बंधनकारक
– मुंबई उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटी-शर्तींचे पालन करावे लागणार
– मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र, स्टेजसाठी स्ट्रक्चरल इंजिनीयरचे बांधकाम स्थैर्यता प्रमाणपत्र सादर करावे लागणार
– ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियमावली तरतुदीचे पालन बंधनकारक
– मेळाव्यासाठी रात्री १० वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे.
– सभा संपल्यावर मैदान स्वच्छ व पूर्ववत करणे आवश्यक
– सर्व नियमांचे पालन करण्यात येईल याबाबतचे १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र सादर करणे आवश्यक