नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने त्याच्या पहिल्या व्यावसायिक उड्डाण प्रमाणीकरण चाचणीसह कार्यान्वित होण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल काही महिन्यांन पूर्वी उचलले असून नवी मुंबई इंटर नॅशनल विमानतळावरून इंडिगो एअरलाइन्सचे A320 विमान यशस्वीरित्या खाली उतरले होते. विमानतळाची धावपट्टी व इतर कामे आता पूर्ण झाली असून इतर कामे युद्धपातळी सुरू आहेत. येत्या ऑगस्ट महिन्यात उद्घाटन होऊन नवी मुंबई विमाताळवरून पहिले विमान टेक ऑफ होणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्याने नवी मुंबई विमानतळाचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा सुरु आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ जागतिक दर्जाच्या विमान वाहतूक सुविधाच देणार नाही, तर ते या क्षेत्राचा सर्वांगीण विकासदेखील सक्षम करेल, असे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनी या आधीच प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. नवी मुंबई विमानतळावर विविध कनेक्टिव्हिटी असणार आहे. मेट्रोसह बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी विमानतळावर असणार आहे. एक्स्प्रेस वे, उपनगरीय रेल्वे, जलमार्गाची कनेक्टिव्हिटी असणार आहे. त्याचा फायदा मुंबई, ठाणे, कल्याण, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला होणार आहे. हे विमानतळ एक माईल्डस्टोन असणार आहे. या विमानतळामुळे मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावरील भारही कमी होणार आहे.







