• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin by admin
June 15, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने गेल्या सात वर्षांत महाराष्ट्रात जलसुरक्षा, आरोग्यसेवा, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाला तोंड देण्याच्या क्षमतेच्या विकासासाठी राबविलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा राज्यातील ८.३ लाखांहून अधिक नागरिकांना थेट लाभ झाला आहे. या उपक्रमांमुळे राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, राज्य शासन आणि खासगी क्षेत्र यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे विकासाचे फायदे समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचत आहेत. जलसंवर्धन, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण आणि आरोग्यसेवा या क्षेत्रांत स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने केलेले कार्य राज्याच्या विकास उद्दिष्टांना पूरक ठरत आहे. बँकेच्या विविध सामाजिक उपक्रमांच्या लाभार्थ्यांमध्ये महिलांचे प्रमाण ५२ टक्क्यांहून अधिक असून, जलसंधारण, आरोग्यसेवा आणि उपजीविका वृद्धी या क्षेत्रांवर विशेष भर देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये; तसेच राज्यातील ७५ टक्के आकांक्षी जिल्ह्यांमध्ये हे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले आहेत. जलसुरक्षा उपक्रमांतर्गत १.०६ अब्ज लीटर गोड्या पाण्याची साठवण क्षमता निर्माण करण्यात आली असून, दुष्काळग्रस्त भागांमध्ये ४५ वॉटर एटीएमची स्थापना करण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील गावांसह राज्यातील २७१ गावांमध्ये जलसुरक्षा मजबूत करण्यात आली आहे; तसेच आठ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना जलसंवर्धन उपाययोजना आणि हवामान-सुसंगत शेती तंत्रज्ञानासाठी मदत करण्यात आली आहे. हवामान बदलाचे परिणाम कमी करण्याच्या दिशेने सात लाख वृक्षांची लागवड हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. रोजगारक्षमतेच्या क्षेत्रात ६५९८ युवकांना कौशल्य विकास आणि रोजगार प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी ६३ टक्के युवकांना रोजगार मिळाला आहे. इलेक्ट्रिक वाहने, वाहन उद्योग, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रॉनिक्स, बँकिंग आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांचे सरासरी वार्षिक उत्पन्न १.६६ लाख रुपये इतके नोंदविण्यात आले आहे. या कार्यक्रमातील ६१ टक्के लाभार्थी महिला असून, ग्रामीण भागातील महिला उद्योजिकांना विशेष आर्थिक सहाय्य पुरविण्यात आले आहे. याशिवाय ७५८ महिला सूक्ष्म उद्योजिकांनाही मदत करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रात बँकेच्या ‘सीईंग इज बिलिव्हिंग’ या प्रमुख उपक्रमांतर्गत चार लाख ३९ हजार ६८८ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली, तर ३८ हजार ६२५ नेत्रशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आल्या. राज्यभरात ४९ दृष्टी केंद्रांची स्थापना करण्यात आली असून, ही केंद्रे आता स्वयंपूर्ण पद्धतीने कार्यरत आहेत. या केंद्रांमधून दरवर्षी सुमारे १.६ कोटी रुपयांचे उत्पन्न निर्माण होत आहे. जिल्हा अंधत्व नियंत्रण संस्था आणि आयुष्मान भारत यांसारख्या शासकीय योजनांशी समन्वय साधून या उपक्रमांचा विस्तार करण्यात आला आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँक, भारतच्या शाश्वतता विभागाच्या प्रमुख करुणा भाटिया यांनी सांगितले की, वंचित आणि दुर्लक्षित समुदायांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी बँक कटिबद्ध असून, महाराष्ट्रातील जलसुरक्षा, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रातील उपक्रम ही दीर्घकालीन सामाजिक बांधिलकीची प्रभावी उदाहरणे आहेत. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी नमूद केले की, राज्यातील लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे हे उपक्रम शाश्वत विकास, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनाला गती देणारे ठरत आहेत.

Previous Post

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

Next Post

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

admin

admin

Next Post
माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! - मध्य रेल्वेचा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

June 15, 2026
राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 15, 2026
‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,052)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (958)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,441)
  • मुंबई (3,123)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (247)
  • रायगड (38)
  • राष्ट्रीय (424)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

June 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

मुंबई मेट्रो ‘अॅक्वा लाईन’वर विद्यार्थ्यांना मिळणार २५% सूट!

June 15, 2026
माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

माथेरान टॉय ट्रेनला ४ महिन्यांचा पावसाळी ब्रेक! – मध्य रेल्वेचा निर्णय

June 15, 2026
राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्याच्या विकासात ‘स्टँडर्ड चार्टर्ड’ बँकेचे योगदान महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 15, 2026
‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ वादावर महापौर रितू तावडे संतप्त; स्टँड-अप कॉमेडी शोवर बंदीची मागणी!

June 13, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION