पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ससून रूग्णालयात एका मनोरूग्णानं आत्महत्या केली आहे. ११ व्या मजल्यावरून उडी घेऊन त्यानं आयु्ष्य संपवलं. याआधीही या तरूणानं रेल्वेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, आज त्यानं इमारतीवरून उडी घेत आयुष्य संपवलं. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय असे मनोरूग्णाचे नाव आहे. त्यानं ५ सप्टेंबर रोजी रेल्वेसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्थानिकांनी पाहिलं. स्थानिकांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी विजयला वाचवलं. यानंतर पोलिसांनी त्याला ससून रूग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, आज सकाळी त्यानं पुन्हा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. विजयने ससून रुग्णालयाच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारत आयुष्य संपवलं. उंचीवरून उडी घेतल्यामुळे तो रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडला होता. याबाबतची माहिती पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन रूग्णालयात पाठवले. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.