वृत्तसंस्था : भारत सरकारनं वसाहतवादाच्या खुणा आणि मानसिकता बदलण्याचा चंग बांधला आहे. त्यानुसार आता रेल्वे प्रशासनामध्ये देखील मोठे बदल करण्यात येणार आहेत. आता रेल्वे अधिकाऱ्यांच्या अंगावरील बंद गळ्याचा काळा कोट जाणार आहे. हा पोशाख इंग्रजांच्या काळापासून वापरण्यात येत होता. आता रेल्वे मंत्रालयानं यात बदल करण्याचा निर्णय घेतला असून स्वदेशी पोशाख अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर रेल्वे मंत्रालय रेल्वेच्या प्रभागांसह इतर ठिकाणांना ब्रिटीशांनी दिलेली नावे बदलणार असून आता त्यांना भारतीय नाव देण्यात येणार आहेत.







