मुंबई : मुंबईतील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे भुयारी मेट्रो ३. येत्या ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो 3 मार्गिका आता पूर्णपणे सुरू होणार आहे. या संपूर्ण मार्गावर २८० फेऱ्या चालवण्यात येणार आहे. शेवटच्या टप्प्यातील आचार्य अत्रे चौक ते कफ परेडपर्यंतच्या उर्वरित ११.२ किमी लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा बुधवारपासून सुरू होणार आहे. सध्या एमएमआरसीच्या ताफ्यात २८ मेट्रो गाड्या आहेत. सकाळी ५.५५ वाजता पहिली मेट्रो सुटणार असून रात्री १०.३० वाजता शेवटची मेट्रो सुटेल. तसंच, गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी मेट्रो सुटणार आहे. या संपूर्ण मार्गिकेवर २७ स्थानके आहेत. मेट्रो ३ मार्गिकेचे तिकीट १० रुपयांपासून सुरू होऊन अधिकतम ७० रुपये असणार आहे.
मुंबई मेट्रो ३ मार्गिकेची जोडणी अन्य मेट्रो मार्गिकांनाही करण्यात येणार आहे. त्यामुळं नागरिकांचा प्रवास आणखी सोप्पा होणार आहे. मुंबईकरांना प्रवास धक्काबुक्की करत करावा लागणार नाही. तसंच, मुंबई लोकलची गर्दीदेखील कमी होणार आहे.
- स्वामी समर्थनगर ते कांजूरमार्ग मेट्रो ६- आरे जेव्हीएलआर
- घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो १- मरोळ नाका
- दहीसर ते विमानतळ मेट्रो ७ आणि ७ अ-विमानतळ टर्मिनल २
- मंडाळे ते डी.एन.नगर मेट्रो २-बीकेसी
- चेंबूर ते सात रस्ता मोनोरेल- महालक्ष्मी
कफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.







