पुणे : पुण्यात पीएमपी बसच्या फुकट्या प्रवाशांकडून ७६ लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. १० महिन्यांत तब्बल १५ हजार प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केले. १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या १५ हजारवर गेली असल्याचे महामंडळाने जाहीर केले आहे. दररोज सरासरी ६५ प्रवासी करतात विनातिकीट प्रवास करतं असल्याची माहिती समोर आली आहे. पीएमपीकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना ५० ते ५०० रुपयांपर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही तिकीट काढले तपासणी वेळी ते हरवले तरी ५०० रुपये दंड भरावा लागतो. सिग्नल तोडल्यास पीएमपी बस चालकांना बसणार १२०० रुपये दंड भरावा लागतो. दोन दिवसांत दोन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
पीएमपीच्या चालक आणि वाहकांबद्दलच्या तक्रारीचे प्रमाण वाढल्या आहेत. नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत असल्याचे पीएमपी प्रशासनाच्या लक्षात आल्याने नियम मोडणाऱ्या चालक आणि वाहकांवर कारवाईचा बडगा उडाला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास चालकांना १२०० रुपये दंड भरावा लागणार असून, निलंबनाची कारवाई होण्याची ही शक्यता आहे. आत्तापर्यंत प्रवाशांच्या तक्रारीनुसार दोन कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. पीएमपीकडून किफायतशीर दरात सेवा दिली जाते, मात्र तरीही काही प्रवासी नियमांकडे दुर्लक्ष करतात. महामंडळाकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवून दंड आकारणी केली जाते, तरीही हा प्रकार कमी होत नाही. प्रवाशांनी नियमांचे पालन करावे आणि दंड टाळावा. महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दररोज सरासरी ६५ ते ७० जण विनातिकीट प्रवास करतात, या आकडेवारीनुसार दररोज सरासरी २५ हजारांपेक्षा अधिक रुपयांची दंड वसूली पीएमपीकडून होत असते.