मुंबई : लक्ष्यावधी जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला आणि दिव्यांग व्यक्ती महाराष्ट्रातील बस सेववर दैनंदिन जीवनाकरीता विसंबून असतात, आता सार्वजनिक परिवहनाकरीता पैसे प्रतिष्ठित पद्धतीने, सहज सोप्या आणि स्मार्ट पद्धतीने करता येणार आहे. ईबिक्स टेक्नॉलॉजीज लिमिटेड, ही एराया लाईफ़स्पेस लिमिटेडची एक प्रमुख सबसिडरी असून, त्यांचा द्वारे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) सादर करण्यात आले आहे, हा उपक्रम महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (MSRTC) करीता, एनएसडीएल पेमेंट्स बॅंकेसह भागीदारी करून राबविला जाणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्र फ़डणावीसांद्वारे करण्यात आले, कार्यक्रमास उपमुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथ शिंदे आणि श्रीमती सुनेत्रा अजित पवार देखील उपस्थित होते. कार्यक्रमास परिवहन कॅबिनेट मंत्री प्रताप सरनाईक आणि महाराष्ट्रातील इतर कॅबिनेट मंत्र्यांनी देखील हजेरी लावली.
हे देशातील पहिले राज्यव्यापी एनसीएमसी असून, याची रचना ही खास सवलतधारकांकरीता करण्यात आली आहे, यामुळे सुमारे ५० सवलत श्रेणी एकाच छताखाली येऊन पहिल्यांदाच डिजिटल देय माध्यमाचा भाग होतील. कोट्यावधी रूपयांची उलाढाल या उपक्रमा अंतर्गत होईल असा अंदाज असून यामुळे विखूरलेल्या कागदावर विसंबून सुविधा या सहज, आधार ने लिंक करून डिजिटल माध्यमाने प्रदान केल्या जातील- यामुळे योग्य लोकांपर्यंत, पारदर्शक पद्धतीने आणि परिणामकारकरित्या, प्रत्येक वेळी बसमध्ये चढल्यानंतर सुविधा मिळण्याची हमी मिळेल. महाराष्ट्राचा शहरं, गावं आणि अगदी ग्रामीण भागातून , एमएसआरटीसीचा सुमारे १६,००० बसेस १३ कोटी प्रवाशांना दरमहिन्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात ज्यामुळे ही भारतातील सर्वात विस्तारीत आणि सामाजिक स्तरावर महत्वाची सार्वजनिक परिवहन प्रणाली आहे- आणि म्हणूनच हा उपक्रम राबविण्याकरीता योग्य आहे. या उपक्रमांतर्गत वर्षाला किमान ७० लाख एनसीएमसी कार्डची निर्मीती केली जाईल, ज्यामध्ये कालांतराने २ कोटी कार्डांपर्यंत वाढ केली जाईल, आणि त्यांचे सुमारे ३,००० अधिकृत रिटेल आऊटलेट्समध्ये तसेच प्रत्येक एमएसआरटीसी डेपो आणि बस स्टेशनवर देखील वितरण केले जाईल. रूपे प्रिपेड कार्डस आंतरिक पद्धतीने वापरता येणाऱ्या या कार्डमुळे टॅप करून पैसे भरण्याची सोय उपलब्ध असेल ज्यामुळे विविध परिवहन सुविधा उपलब्ध होऊ शकतील- यामुळे दैनंदिन परिवहन सोपे तर होईलच, पण खऱ्या अर्थाने कनेक्टेड राहाता येऊ शकेल.







