मुंबई : मुंबई शहरासह राज्यात अंमली पदार्थाच्या तस्करी आणि विक्रीत वाढ झाल्याचे आकडेवारीनुसार आहे. सर्वात जास्त अमली पदार्थांच्या तस्करी मुंबईत वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ९१७ प्रकरणात ४६ कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहे. यात सर्वात जास्त एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत २८ कोटी एवढी किंमत आहे. अमली पदार्थांचे व्यसन पूर्वी उच्चभ्रू वस्तीतील लोकांपर्यंत मर्यादित होते. मात्र नागरिकांचे काही प्रमाणात उंचावलेले राहणीमान तसेच जीवनशैली यामुळे अमली पदार्थ सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. परिणामी अमली पदार्थांच्या विळख्यात मोठमोठ्या आयटी कंपन्यामध्ये किंवा कॉर्पोरेट कंपन्यांमधील कर्मचारी, महाविद्यालीन विद्यार्थ्यांपासून ते शाळकरी मुलेसुद्धा आली आहेत.
अमली पदार्थांच्या तस्करीच्या साखळीत राज्यातील इतर शहरांना प्रामुख्याने मुंबईतून ड्रग्स, हिरोईन, एमडी, चरस आणि कोकेनचा पुरवठा केला जातो. स्थानिक पोलिसाचे गुप्त माहितीदारांचे जाळे कमकुवत असल्यामुळे अमली पदार्थांची आजही मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. अनेक अमली पदार्थांच्या तस्करांचे राजकीय तर काहींचे पोलीस विभागाशी तार जुळल्याचे मागील काही प्रकरणात समोर आले आहेत. त्यामुळे कितीही प्रतिबंध केला तरीही प्रत्येक शहरात अमली पदार्थाची तस्करी सुरू आहे. प्रामुख्याने मुंबई आणि गोवा ही २ शहरे अमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनली आहेत. आजच्या तरुणाईत काही तरुणांना अमली पदार्थांचे सेवन करणे विशेष मानले जाते. तरुणाईत हा ट्रेंड घातक असून, काही प्रकरणात अमली पदार्थांचा वापर शारीरिक आणि लैंगिक क्षमता वाढविण्यासाठी देखील केला जातो. परिणामी तरुणांमध्ये अमली पदार्थांच्या सेवनाने प्रमाण वाढले आहे. नाईट लाईफ पब आणि क्लबचे आकर्षण सर्वात महत्वाचे कारण आहे. काही पबमध्ये अमली पदार्थाची विक्री करण्यात येते. इथे येणाऱ्या तरुण तरुणींना ड्रग्सचे व्यसन लावले जाते. त्यानंतर तरुणींचा वापर ड्रग्स तस्करी आणि देहव्यापारासाठी करण्यात येत असल्याची काही प्रकरणात समोर आले आहे.
यावर्षी पहिल्या आठ महिन्यातील कारवाई :
अमली पदार्थ. प्रकरणे अटक. मात्रा/kg. किंमत
हेरॉईन. २२. २५. १.३. ३.२० कोटी
चरस १८.२७ ८.५ १.८२ कोटी
कोकेन. ५. ७. ०.२ ४९.६८ लाख
गांजा. ६३५ ६८५. ५०९. १.८९ कोटी
एम डी. २४६. ३३८ १८.१ २८.४३ कोटी
कारवाई. ६१७२.६२७७
एकूण. ७१४७. ७४३८. ५५३.3 ४६.२८कोटी