पुणे : सायबर चोरट्यांनी मोबाईलवर शेअर मार्केटबाबत मॅसेज पाठवून त्यात गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाला ३८ लाखाला गंडा घातला आहे. याप्रकरणी ६३ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अज्ञात मोबाईल धारकावर गुन्हा नोंद केला आहे. १ मार्च ते ४ मे २०२४ या कालावधीत घडला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार रामबाग कॉलनीत राहण्यास आहेत. दरम्यान, त्यांना अनोळखी क्रमांकावरून मॅसेज आला. त्यात एक लिंक होती. आयसीआयसीआर ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले होते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखविले. त्यांना गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यांना वेगवेगळ्या बहाण्याने गुंतवणूकीच्या नावाखाली पैसे पाठविण्यास सांगितले. तक्रारदारांनी केवळ महिन्यात एकूण ३७ लाख ७० हजार रुपये पाठविले. परंतु, त्यांना परतावा तसेच गुंतवलेली रक्कम परत न करता फसवणूक केली.