नवी दिल्ली : दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला. या शक्तिशाली स्फोटामुळे सर्वत्र भीती पसरली. जवळपासच्या दुकानांचे दरवाजे आणि खिडक्या फुटल्या आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. एका कारमध्ये हा स्फोट झाला असून जवळच्या ३ गाड्यादेखील यात जळाल्या आहेत. संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी हा स्फोट झाल्याचे वृत्त आहे. तसेच २ ते ३ जण जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर तेथे लोकांचीदेखील गर्दी झाली.
दिल्ली पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहेत आणि तपासात सुरु आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली आहे. या संदर्भात पोलिसांनी कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. दरम्यान लाल किल्ला परिसर हा दिल्लीतील सर्वात वर्दळीच्या आणि दाट लोकवस्तीच्या क्षेत्रांपैकी एक आहे. दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट झाल्याची नोंद झाली. त्यानंतर जवळच उभ्या असलेल्या तीन ते चार वाहनांनाही आग लागली आणि त्यांचे नुकसान झाले. अग्निशमन विभागाच्या अपडेटनुसार, त्यांना कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत एकाचा मृत्यू झालाय.. सध्या स्फोटाचे कारण अस्पष्ट आहे. प्राथमिक तपासात सिलेंडरचा किंवा कारच्या बॅटरीचा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे. दिल्ली पोलीस, बॉम्ब निकामी पथक आणि विशेष पथकाचे पथक घटनास्थळी उपस्थित असून संपूर्ण परिसराची कसून चौकशी करत आहेत. खबरदारी म्हणून, परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.







