मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड असा ५ वा टी२० सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने तडाखेबंद शतक लगावले आहे. अभिषेक शर्माने ३७ चेंडूत शतकी खेळी केली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये अभिषेक शर्माचे वादळ घोंघावत होते. इंग्लंडच्या एकाही गोलंदाजांना त्याने सेट होऊ दिले नाही. ११८ व्या ओव्हरमध्ये शर्मा बाद झाला. त्याने ५४ चेंडूत १३५ धावा ठोकल्या.
अभिषेक शर्माने केवळ ३७ चेंडूत शतक पूर्ण केले. ३७ चेंडूत ५ चौकार आणि १० षटकार लगावले. अभिषेक शर्माने या प्रकारे लगावलेले हे दुसरे शतक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सर्वात तिसरे वेगवान शतक आहे. याधी रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर यांनी याप्रकारे शतक लगावले आहे. भारताच्या संघासाठी पॉवरप्ले अत्यंत चांगला गेला. भारतीय संघाने १ विकेट गमावून ९५ धावा केल्या. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांच्यात भागीदारी झाल्याचे दिसून आले. अभिषेक शर्माने १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमाकांवर आला आहे.





