• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

पावसापूर्वी रस्ते वाहतूक योग्य करण्याचे निर्देश; १० जूनची रस्ते कामांसाठी आता अंतिम मुदत

शहर आणि उपनगरात सुरू असलेली रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना आता १० जूनची अंतिम मुदत दिली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
June 7, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शहर आणि उपनगरात सुरू असलेली रस्ते कॉंक्रिटीकरणाची कामे पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना आता १० जूनची अंतिम मुदत दिली आहे. पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर रस्ता रोधक (बॅरिकेड्स), बांधकाम साहित्य दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी, पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते वाहतूक योग्य करावे, असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत. संपूर्ण पावसाळ्यात कोणत्याही यंत्रणेला रस्ते खोदकाम करण्याची परवानगी देता येणार नाही. केवळ वीज, गॅस, पाणी यांसारख्या अत्यावश्यक गरजांच्या कामांसाठी गरजेनुसारच रस्ते खोदकामाची परवानगी देण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले आहेत. पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात मुंबईकरांना रस्त्यांच्या कामांमुळे किंवा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. मुंबई महानगरातील पावसाळापूर्व तयारीचा भाग म्हणून रस्त्यांच्या कामांशी संबंधित बाबींचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी वरील सूचना दिल्या. पावसामुळे रस्त्यांवर तयार होणाऱ्या खड्ड्यांच्या तक्रारींचा निपटारा शक्यतो २४ तासांमध्ये करावा, पावसाळ्यात मुंबईतील खड्डेमुक्त रस्त्यांसाठी रस्ते विभाग आणि इतर सर्व संबंधित यंत्रणा सक्षमपणे आणि एकसंघपणे कार्यरत आहे, याचा अनुभव आपल्या कामकाजातून नागरिकांना आला पाहिजे, त्यासाठी सर्व संयंत्रे आणि साहित्याची उपलब्धतता राहील याची खातरजमा करा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. पावसाळ्यात कोणत्याही यंत्रणेला रस्ते खोदकाम करण्याची परवानगी देता येणार नाही. मात्र वीज, गॅस, पाणी यांसारख्या अत्यावश्यक गरजांच्या कामांसाठी आवश्यकतेनुसारच रस्ते खोदकामाची परवानगी द्यावी. संबंधित यंत्रणेने त्यांची कामे पूर्ण केल्यानंतर खड्डा बुजवला नसल्याचे आढळल्यास महानगरपालिकेने स्वतःहून तो बुजवावा आणि दुरूस्तीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घ्यावा, अशी सूचनाही बांगर यांनी केली.

रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी विभागनिहाय प्रत्येकी तीन याप्रमाणे एकूण ७२ मास्टिक कुकर उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सर्व मास्टिक कुकर संयंत्रांवर जीपीएस लावून त्याआधारे संयंत्रांच्या उपलब्धततेवर लक्ष ठेवले जाईल. त्यासाठी डॅशबोर्डची निर्मिती करण्यात येत आहे. तसेच संपूर्ण मुंबईत जास्त पावसाच्या कालावधीत रस्त्यांवरील खड्डे बुजविताना, प्राप्त तक्रारी लक्षात घेऊन कमीत कमी वेळेत खड्डे बुजविता येतील अशा रितीने मार्गांचा क्रम आखावा, खड्डे बुजविताना चौकोनी आकारात मास्टिकद्वारे खड्डे व्यवस्थित भरावेत, अशा सूचना बांगर यांनी केल्या. तसेच खड्डा वेड्यावाकड्या आकारात भरला जाणारा नाही यादृष्टीने खबरदारी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. सर्व विभागातील खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्टिक मिश्रणासाठीचे कुकर हे सुस्थितीत, तसेच वापरासाठी उपलब्ध असावेत, याची खातरजमा विभागीय पातळीवर करावी. तसेच सर्व मास्टिक कुकरला लवकरात लवकर जीपीएस यंत्रणा बसवण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचनाही बांगर यांनी दिल्या. त्याचप्रमाणे सर्व संबंधित कंत्राटदारांना सूचना करून मास्टिकचे उत्पादन व उपलब्धता, आवश्यक तेव्हा व आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होईल, यासाठी आतापासूनच खातरजमा करून ठेवावी. तसेच खड्डे बुजवण्याची कामे करताना विविध विभागांनी आपापसात समन्वय व नियोजन राखावे, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी नागरी मदत सेवा क्रमांक १९१६, समाजमाध्यमे, व्हॉट्स ॲप चॅटबॉट, पॉटहोल फिक्सिंग मोबाइल ॲप तसेच दुय्यम अभियंत्यांचे मोबाइल क्रमांक इत्यादी विविध पर्याय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या सर्व माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर, तसेच विभागनिहाय शोधण्यात आलेले खड्डे बुजवण्याची कार्यवाही शक्यतो २४ तासात पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मुंबई महानगरात सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांची विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी बहुतांश कामे पूर्णत्वाकडे आहेत, तर काही कामे प्रगतिपथावर आहेत. यामध्ये मुंबई शहर भागात २४ ठिकाणी, तसेच पूर्व उपनगरात ३२ ठिकाणी, तर पश्चिम उपनगरामध्ये ८७ ठिकाणी कामे सुरू आहेत. यापैकी बहुतांश रस्ते ७ जूनपासून वाहतूकीसाठी उपलब्ध होतील. तर उर्वरित काही रस्ते १० जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुले होतील, अशी माहिती बांगर यांनी दिली.

Previous Post

७८ लाखांचे सोने सीमा शुल्क विभागाकडून ताब्यात

Next Post

अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत; मनसेची कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अभिजीत पानसे उमेदवारी अर्ज भरणार नाहीत; मनसेची कोकण पदवीधर मतदारसंघातून माघार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (35)
  • कोकण (61)
  • कोल्हापूर (33)
  • कोल्हापूर जिल्हा (12)
  • गुन्हेगारी (1,125)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (490)
  • नवी मुंबई (211)
  • नागपूर (114)
  • नाशिक (84)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,050)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (2,033)
  • मुंबई (3,482)
  • रत्नागिरी (58)
  • राजकीय (277)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (537)
  • वसई-विरार (65)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (10)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (208)

Follow Us

Recent News

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मणाऱ्या नवजात बाळांना मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

September 19, 2026
केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

केंद्राच्या मंजुरीची वाट न पाहता दुष्काळग्रस्त बळीराजाला राज्य सरकार देणार थेट मदतीचा हात – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

September 19, 2026
ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

ग्लोबल मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसचा डंका वाजणार; ‘मंगोनेट’ नोंदणी वाढवण्यासाठी कृषी विभाग सज्ज!

September 19, 2026
तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

तिरुपती लाडू तूप भेसळ प्रकरणी ‘ईडी’चा मोठा दणका; ‘सुकृती फूड्स’चा मालक अटकेत!

September 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION