• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

केळी पिकाच्या विम्यासंदर्भात विधानभवनात बैठक; शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश

admin by admin
June 24, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नुकसानीच्या आकडेवारीसाठी ड्रोनचा वापर करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील सर्वाधिक मूल्य असलेल्या पिकांच्या नैसर्गिक आपत्तीत होणा-या नुकसानीची  अचूक आकडेवारी मिळविण्यासाठी आगामी कालावधीत कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन यांनी संयुक्तरित्या ड्रोनचे सर्वेक्षण करण्यासाठी कार्यवाही करावी. यामुळे शेतक-यांना झालेल्या नुकसानीची अचूक माहिती मिळेल  व पीक विमा कंपन्यांना भरपाई देताना कोणतीही अडचण येणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील  केळी पिकांच्या नुकसानीबाबत विमा कंपन्यांनी स्थानिक प्रशासनाने केलेली नोंद तपासून घ्यावी. रियल टाइम डाटा, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरचा डाटा आणि सॅटेलाइट डाटा तपासून घेऊन तात्काळ भरपाईची कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जळगाव जिल्ह्यातील केळीबाग नुकसानीसंदर्भात विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, रोहियो मंत्री भरत गोगावले, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, प्रधान सचिव डॉ.श्रीकर परदेशी, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे, यासह इतर विभागाचे अधिकारी तसेच विमा कंपन्याचे प्रतिनिधी  उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी पीकविमा योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता विमा कंपन्यानी घेतली पाहिजे. त्याचवेळी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पडताळणी प्रक्रिया अधिक मजबूत करण्यात यावी. जळगाव जिल्ह्यात २०२५-२६ या हंगामात केळी पीकासाठी सुमारे ९९ हजारांहून अधिक विमा अर्ज प्राप्त झाले होते. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर  मार्फत उपग्रह छायाचित्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र तपासणी करण्यात आली. यामुळे प्रत्यक्ष लागवड झालेल्या क्षेत्राची अचूक पडताळणी शक्य झाली असून पात्र शेतकऱ्यांचे हित अधिक प्रभावीपणे संरक्षित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत राज्य शासनाने फळपिक विमा योजनांद्वारे शेतकऱ्यांना मोठा आधार दिला आहे. केळी पिकासाठी विमा संरक्षणाची रक्कम प्रतिहेक्टर १.७० लाख रुपये असून नैसर्गिक आपत्ती, गारपीट, कमी तापमान, वेगवान वारे आणि अतितापमान यांसारख्या जोखमींपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळत आहे.”राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. पात्र केळी उत्पादकांना न्याय मिळेल याची पूर्ण काळजी घेतली जाईल. पीकविमा योजनेतील पारदर्शकता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा व्यापक वापर करण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम करणे हेच राज्य सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विमा कंपन्यांनी  शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता झालेल्या नुकसानीनुसार मदत करावी. विमा कंपन्यांनी आपली मानसिकता बदलावी. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन विमा कंपन्याना पैसे देत असते त्याची जाणीव ठेवून शेतकरी अडचणीत असताना  कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता नियमांप्रमाणे  शेतक-यांना मदत वितरीत करावी. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील  म्हणाले की, जळगाव येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मदत मिळण्यासाठी नुकसानीचे पंचनामे तपासून  सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. महसूल विभागाची मदत घेऊन बाधित शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत. शेतकऱ्यांना त्वरित मदत पाहचवावी. बैठकीत जळगाव जिल्ह्यातील केळी पीकविमा संदर्भातील स्थिती, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर  मार्फत करण्यात आलेली उपग्रहाधारित तपासणी, पात्र व अपात्र विमा प्रस्तावांची माहिती तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Previous Post

ड्रग्ज माफियांविरोधात फडणवीस सरकारचा मोठा प्लॅन; ‘टीप द्या, बक्षीस मिळवा’ योजना जाहीर!

Next Post

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत!

admin

admin

Next Post
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत!

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई; मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,099)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,025)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,808)
  • मुंबई (3,356)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (496)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व शेतकऱ्यांना लवकरच दिवसा मोफत वीज; थकबाकीमुक्त प्रमाणपत्रही मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

उद्यापासून घाटकोपर-अंधेरी मेट्रो मार्गावर धावणार ‘शॉर्ट-डिस्टन्स’ स्पेशल फेऱ्या!

August 8, 2026
‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

‘एसआयआर’ प्रक्रियेसाठी वसई-विरार प्रशासन ऑन मोड; सुट्टीच्या दिवशीही बीएलओ केंद्रावर हजर!

August 8, 2026
स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

स्वातंत्र्यदिनी पर्यटकांना मोठी भेट! १५ ऑगस्टला होणार दाभोसा स्काय वॉकचे उद्घाटन

August 8, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION