नवी दिल्ली : दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानं सारा देश हादरला आणि त्यानंतर या स्फोटाशी असणारी दहशतवादी पाळंमुळं समोर येताच अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. इथं केंद्रीय यंत्रणांनाही या स्फोटानं हादरा दिला असून, देशाच्या गुप्तचर यंत्रणेपासून ते सुरक्षा यंत्रणेपर्यंत सर्वजण अधिक सतर्क झाले. ही संपूर्ण परिस्थिती पाहता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (११ नोव्हेंबर २०२५) बुधवारी सायंकाळी संरक्षण समितीसह कॅमिनेट समितीची बैठक घणार असून, भूतान दौऱ्याहून परतल्यानंतर लगेचच पंतप्रधान या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ला मेट्रो स्थानकानजीक धीम्या गतीनं जाणाऱ्या कारमध्ये एक भयावह स्फोट झाला, ज्यामध्ये आतापर्यंत १२-१३ जणांचा मृत्यू ओढावल्याचं वृत्त आहे. याच धर्तीवर देशातील सुरक्षिततेत आलेल्या अस्थिरतेच्या मुद्द्यावरून सदर बैठक अतिशय महत्त्वाची असल्याचं म्हटलं जात आहे. मंगळवारी पंतप्रधान मोदी पूर्वनियोजित भूतान दौऱ्यावर देले, मात्र त्यांनी सोशल मडियाच्या माध्यमातून दिल्लीतील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केल्याचं पाहायला मिळालं. भूतानची राजधानी थिम्पू इथं संवद साधताना दिल्लीतील स्फोटात ज्यांनी आप्तजनांना गमावलं आहे त्यांचं दु:ख मी समजू शकतो असं म्हणत त्यांनी या क्षणी सहानुभूतीची व्यक्त केली.
दिल्लीत घटनेनं सर्वांनाच हादरा दिला असल्यानं आपण जड अंत:करणानं इथं आल्याचं सांगताना दोषींना न्यायाच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल असं मोदी निर्धारानं म्हणाले. त्यांच्या या उद्गारांमुळं आणि पुढं लगेचच घेतल्या जाणाऱ्या बैठकीमुळं आता पंतप्रधान नेमका कोणता मोठा निर्णय घेणार याकडेच संपूर्ण देशाचं लक्ष असेल. वरील सर्व घडामोडींदरम्यानच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी मंगळवारी कर्तव्य भवन इथं एक उच्चस्तरित बैठक घेतली. जिथं त्यांनी स्फोट आणि त्याभोवतीच्या सर्व लहानमोठ्या घडामोडींचा आढावा घेतला. दरम्यान घटनांचा एकंदर क्रम पाहता २०२५च्या एप्रिल महिन्यात झालेल्या पडलगाम हल्ल्यानंतर पार पडलेल्या उच्चस्तरिय बैठकीनंतरच संरक्षण यंत्रणांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची धडक कारवाई केली होती. दिल्ली स्फोटानंतरही अशा बैठकांना वेग आला असून, आता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती तर होतेय का? हा प्रश्न इथं उपस्थित राहत असून, तिथं पाकिस्तानची भंबेरी उडाल्याचंही म्हटलं जात आहे.







