मुंबई : मुंबई शहरात १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून मुख्य जलवाहिन्यांवरील व्हॉल्व्ह बदलण्याचं काम हाती घेण्यात आल्याने शहराच्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. हा पाणीपुरवठा शुक्रवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून शनिवार, १५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत, म्हणजे तब्बल २२ तास खंडित राहणार आहे. जुन्या आणि नवीन तानसा जलवाहिन्यांवरील (१२०० मिमी) आणि विहार ट्रंक मेनवरील (८०० मिमी) पाच व्हॉल्व्ह बदलले जाणार आहेत.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील एन वॉर्डमध्ये १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ३:४५ ते ८:०० वाजेपर्यंत राजावाडी पूर्व, चित्तरंजन नगर, विद्याविहार, राजावाडी रुग्णालय, ओएनजीसी कॉलनी, रेल्वे स्टाफ क्वार्टर्स, आर. एन. गांधी रोड येथे पाणीपुरवठा बाधित राहणार आहे. एल वॉर्डमध्ये १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत नवीन टिळक नगर, लोकमान्य टिळक टर्मिनस, साबळे नगर, संतोषी माता नगर, क्रांती नगर, नेहरू नगर, मदर डेअरी रोड, शिवश्रुष्टी रोड, नाईक नगर, जागृती नगर, केदारनाथ मंदिर रोड, एस. जी. बर्वे रोड कुर्ला पूर्व, नवरे बाग, कामगार नगर, हनुमान नगर, पोलीस क्वार्टर्स, कासाई वाडा, चुनाभट्टी, राहुल नगर, एव्हरार्ड नगर, कुरेशी नगर, तक्षशिला नगर, चाफे गल्ली, पान बाजार, त्रिमूर्ती रोड, व्ही. एन. पुरव मार्ग, उमरवाडी मार्ग, अली दादा इस्टेट, राजीव गांधी नगर, स्वदेशी जीवन चाळ, चुनाभट्टी गेट, म्हाडा कॉलनी प्रेम नगर, हिल रोड, मुक्तादेवी रोड, ताडवाडी, समर्थ नगर येथे पाणीपुरवठा खंडित होईल.







