मुंबई : मतदार यादी घोळाच्या मुद्द्यावरून मुंबईत राजकीय रणसंग्राम पाहायला मिळाले. निवडणूक आयोगाविरोधात राज ठाकरे यांच्या मनसेने मविआ सत्याचा मोर्चा काढला. यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह दिग्गज नेते उपस्थित होते आहे. राज ठाकरे यांच्या मनसेने या मोर्चाचे नियोजन केले होते. सत्याच्या मोर्चा राज ठाकरेंना महागात पडला आहे. पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आयोजकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मनसे आणि मविआच्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांविरोधात अॅक्शन घेण्यात आली आहे. परवानगी नसताना मोर्चा काढल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यानंतर विरोधक आणि सत्ताधा-यांमध्ये जुंपली आहे. आमच्या मोर्चावर गुन्हा मग भाजपच्या मूक मोर्चावर का नाही? असा सवाल विरोधकांनी केला आहे. मनसे आणि मविआनं काढलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन आणि बेकायदेशीरपणे सभा आयोजित केल्याबद्दल कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकही चांगलेच आक्रमक झाले आहेत. आमच्या मोर्चावर गुन्हा मग भाजपच्या मूक मोर्चावर गुन्हा का दाखल झाला नाही? असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडेंनी केलाय. तर भाजपनं देखील संदीप देशपांडेंवर पलटवार केला.
आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर विरोधकांनी सरकावर निशाणा साधला आहे. मोर्चा काढण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. मात्र, सरकारकडून पक्षपातीपणा सुरू असल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी हल्लाबोल केला आहे तर पोलिसांकडून परवानगी नव्हती तरी मोर्चा का काढला? असा सवाल आनंद परांजपेंनी केला. लोकशाहीमध्ये मोर्चा काढण्याचा अधिकार, गुन्ह्याला घाबरत नाही पोलिसांकडून मोर्चाला परवानगीच नव्हती तरीही त्यांनी मोर्चा काढला. सत्याचा मोर्चा, आयोजकांवर कारवाईचा बडगा काढला. सरकारकडून लोकशाही मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुनील प्रभू यांनी केलाय.. कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही पुन्हा मोर्चा काढू असा थेट इशारा सुनील प्रभू यांनी दिला. शनिवारी झालेल्या सत्याच्या मोर्चामधून ठाकरे बंधू आणि शरद पवारांनी मतदार यादीतील घोळ यावरून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. तसंच सत्ताधा-यांनी केलेल्या सवालांनाही मोर्चातून प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. मात्र, मोर्चाला पोलिसांकडून कोणतीही परवानगी देण्यात आली नव्हती त्यामुळे आता आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







