वृत्तसंस्था : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामने त्यांच्या यूजर्ससाठी ‘Rings Award’ नावाचा एक खास पुरस्कार कार्यक्रम जाहीर केला आहे. हा पुरस्कार पारंपारिक सेलिब्रिटी पुरस्कार सोहळ्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा होणार. या उपक्रमात विजेत्यांना एक अद्वितीय बक्षीस फॅशन डिझायनर Grace Wales Bonner यांनी खास डिझाइन केलेल्या अंगठ्या प्रदान करण्यात येतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून इन्स्टाग्राम आपल्या प्लॅटफॉर्मवरील उपयुक्त कल्पना, क्रिएटिविटी सन्मान करत असून, यूजर्सना आणखी प्रेरणा देण्याचा प्रयत्न करत आहे. या पुरस्कारासाठी निवडलेले २५ निर्माते कोणत्याही विशिष्ट श्रेणीत नामांकित होणार नाहीत. त्याऐवजी, इन्स्टाग्रामची निवड समिती क्रिएटिविटी आणि वेगळेपणावर आधारित यूजर्सची निवड करेल. इन्स्टाग्रामच्या क्रिएटर प्रोग्राम्स संचालिका इवा चेन म्हणाल्या की निवड प्रक्रिया अत्यंत कठोर होती आणि त्यासाठी ते अशा लोकांचा शोध घेत होते, जे आपल्या कंटेंटद्वारे प्रेक्षकांशी नवे नाते निर्माण करतात आणि सोशल मीडियाला नवे विचार आणि कंटेट प्लॅटफॉर्म म्हणून वापरतात.
रिंग्ज अवॉर्ड विजेत्यांना रोख बक्षीस मिळणार नसले तरी त्यांना या पुरस्काराची डिजिटल प्रत दिली जाईल. जी ते आपल्या इन्स्टाग्राम प्रोफाइल व स्टोरीजवर ठेवू शकतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वैयक्तिकरणाची ही सुविधा देण्याची इन्स्टाग्रामची ही पहिलीच वेळ आहे. दोन दशकांपूर्वी मायस्पेस आणि फ्रेंड्सटर यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अशी वैशिष्ट्ये लोकप्रिय होती. या पुरस्काराच्या निवड समितीमध्ये इन्स्टाग्रामचे प्रमुख Adam Mosseri, डिझायनर Grace Wales Bonner, टेक युट्यूबर MKBHD, अभिनेत्री Yara Shahidi, चित्रपट दिग्दर्शक Spike Lee, डिझायनर Marc Jacobs, कलाकार Kaws, मेकअप आयकॉन Pat McGrath, पेस्ट्री शेफ Cedric Grolet, अॅथलीट Ilona Maher, निर्माती Tainy, प्रवास फोटोग्राफर Murad Osmann आणि स्वतः Eva Chen इत्यादी प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे. ही टीम हजारो नामांकनांमधून सर्वोत्कृष्ट २५ निर्मात्यांची निवड करणार आहे. इन्स्टाग्राम दरवर्षी हा पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखते. पहिल्या वर्षीच्या विजेत्यांची घोषणा १६ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.







