मुंबई : बालरुग्णांसाठी असलेल्या सर्व कफ सिरप या प्रवर्गातील औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने राज्यातील सर्व किरकोळ औषध विक्रेते आणि त्यांच्या संघटना दिले आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये कफ सिरपमध्ये भेसळीमुळे झालेल्या बालमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने हे निर्देश दिले आहेत.
आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाचे निर्देश्व सूचना –
- बालरुग्णांसाठी असलेल्या सिरप या प्रवर्गातील औषधांची विक्री ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करू नये.
- औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम १९४५ अंतर्गत अनुसूची एच, अनुसूची एच १ आणि अनुसूची एक्स या औषधांची विक्री डॉक्टरांच्या चिठ्ठीवरच केली जाईल, याची खात्री करावी.
- डॉक्टरांच्या चिठ्ठीविना या औषधांची विक्री होत असल्याने या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी नियमांचे पालन किरकोळ औषध विक्रेत्यांनी करावे.
- या औषधांची विक्री कोणी करत असेल, तर स्थानिक औषध नियंत्रण अधिकाऱ्यांना कळवावे. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.







