वृत्तसंस्था : भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत होती. वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. १९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन वनडे आणि पाच टी२० सामन्यांची मालिका होणार आहे. पण या दौऱ्यापूर्वीच टीम इंडियाच्या नेतृत्वाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. माहिती अशी की, वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्मा नव्हे तर शुभमन गिलचे नाव पुढे येत होते. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली. त्याआधीच शुभमन गिलचं नाव चर्चेत होतं. २६ वर्षीय गिलने कसोटी क्रिकेटमध्ये आपली धडाकेबाज कामगिरी सिध्द केली असून, आता त्याला वनडे नेतृत्वाची संधी मिळाली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे या मालिकेत खेळणार असले तरी वनडे संघाचे नेतृत्व गिलकडे सोपवण्यात आले आहे. गिलला भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार मानलं जातं. रोहित सध्या ३७ वर्षांचा आहे आणि २०२७ वर्ल्ड कपपर्यंत त्याचे वय ४० ओलांडणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन नेतृत्वाच्या दृष्टीने सेलेक्टर्स गिलकडे पाहत आहेत.







