वृत्तसंस्था : उद्धव ठाकरेंनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणातून लाडकी बहीण योजनेमागे मोठं षडयंत्र असल्याचा दावा केला आहे. भाजपा पगारी मतदार तयार करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. मते विकत घेण्यासाठी पैसे आहेत पण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत असा आरोपही त्यांनी केला आहे. आपण पगारी मतदार व्हायचं की स्वाभिमानी हे महिलांनी ठरवायचं आहे असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
“निवडणूक आल्यानंतर महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये टाकले आहेत. महिलांनाही त्याची थोडी मदत झाली. पण शेतकरी म्हणाला भाजपा पगारी मतदार तयार करत आहे. महाराष्ट्राने ठरवायचं आहे की आपण पगारी मतदार व्हायचं की स्वाभिमानी हे महिलांनी ठरवायचं आहे.सर्व कामं रद्द करुन एक फूल, दोन हाफ दिल्लीत जाऊन बसायला हवे होते. सगळे निकष ठेवून मदत करा असं सांगायला हवं होतं. पण पंतप्रधानांना प्रस्ताव हवा आणि मुख्यमंत्र्यांचा अभ्यास सुरु आहे. त्यांना माहिती आहे की, काही दिवसांनी लोक विसरुन जातात,” असा दावा त्यांनी केला आहे.







