मुंबई : मुंबईत स्वतःचं घर असावं, असे प्रत्येक सामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. मात्र, गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतीमुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्णच राहते. परंतु आता म्हाडा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे. गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प हीच त्याची सुरुवात आहे. या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना तब्बल १६०० स्क्वेअर फुटांचे आलिशान घर मिळणार असून, हा प्रकल्प सध्या प्रचंड चर्चेत आहे.
गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगरमधील १, २ आणि ३ या चाळी आता जुन्या झाल्या आहेत. ३,७०० हून अधिक रहिवासी नवीन घराच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, म्हाडा या चाळींचे पुनर्विकास करणार आहे. म्हाडाच्या या प्रकल्पामुळे गैरव्यवहाराची शक्यता नाही. ठरलेल्या वेळेत रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे.







