वृत्तसंस्था : ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांना दिवाळीआधी मोठं गिफ्ट मिळणार आहे. आता कर्मचाऱ्यांना पीएफ काढण्यासाठी कोणत्याही ऑफिसच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. तुम्ही थेट एटीएम किंवा यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकणार आहात.
गेल्या अनेक दिवसांपासून EPFO 3.0 सुरु करणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान आता दिवाळीआधी ही सुविधा सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे. जून महिन्यातच ही सुविधा सुरु होणार होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ही सुविधा सुरु झालेली नाही. मात्र, लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो. श्रम व रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली १०-११ ऑक्टोबर रोजी बैठक होणार आहे. यामध्ये कदाचित निर्णय होण्याची शक्यता आहे. मिडिया रिपोर्टनुसार, दिवाळीआधी ८ कोटी ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी ही नवीन सुविधा सुरु करण्याची योजना तयार करत आहेत.
EPFO 3.0 चे उद्दिष्ट हे आहे की, कर्मचाऱ्यांना बँकेसारखी सुविधा मिळावी. या सुविधेमार्फत एटीएम किंवा यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढू शकतात. दरम्यान, यामुळे अनेक फायदे मिळणार आहे. या EPFO 3.0 मुळे पीएफची सर्व कामे डिजिटल होणार आहेत. ज्यामुळे पैसे काढणे आणि क्लेम करणे ही कामे सोपी होणार आहे. EPFO 3.0 अंतर्गत तुम्ही यूपीआयद्वारे म्हणजे गुगल पे, फोन पे आणि पेटीएम या अॅपद्वारेदेखील पैसे काढू शकतात. ही सर्व कामे तुम्ही ऑनलाइन होणार आहेत. याचसोबत तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यातील बॅलेंस, कॉन्ट्रीब्युशन किंवा व्याजदराचीदेखील माहिती मिळणार आहे.







